युथ हाँस्टेलने मसुरी येथे आयोजित केलेल्या 'हर की घुन ' या ट्रेकला जाणार होतो. मी व मुलगा माझ्या मित्रासह ४ मे च्या बँचला जाण्याचे बुकींग केले. मित्राने रेल्वेचे आरक्षण केले. आँफिसमघ्ये सहकार्यासह रजेसाठी विचारविनीमय करुन माझी रजा मंजुर करुन घेतली. २० दिवस घराबाहेर असल्याने घरातील इतर गोष्टीची नियोजन केले. गेल्या दोन वर्षापुर्वी मी मुलासह मनाली येथे युथ हाँस्टेलच्याच ट्रेक ला गेलो होतो. त्यामुळे या ट्रेकला जाण्याचा आमचा उत्साह वाढला होता.
ट्रेक मघ्ये केलेली मजा आठवत होतो व यावेळेस आणखी मजा कशी करायची याची मनात तयारी करत होतो.मित्रांसह वस्तुची खरेदी सुरु केली. सर्व मित्रांची स्वत:ची तयारी सुरु होती. टोपीपासुन साँक्स पर्यतचे सर्व वुलनचे कपडे व गाँगलपासून बुटापर्यतच्या गोष्टी जमविणे सुरु होते. सह्याद्रीमघ्ये एखादा ट्रेक सरावासाठी जाण्याचे ठरत होते. मुलाची परीक्षा झाल्यावर तो पण त्याच्या तयारीला लागला.
सर्व मित्राना व नातेवाईकाना आमचा ट्रेक चा कार्यक्रम क़ळल्यापासून त्याच्या शुभेच्छा व सावधानतेच्या सुचना येते होत्या. काहीनी खाण्याच्या गोष्टी पाठवून दिल्या. काही जणाना क़ाळजी वाटत होती.काही मित्राना आमच्या बरोबर त्याना येता आले नाही म्हणुन वाईट वाटत होते.
जसा जसा ट्रेकचा दिवस जवळ जवळ येत होता तसे तसे आम्ही स्वप्न रंगवत होतो. जवळ जवळ आम्ही ट्रेकच्या बँगा भरल्या होत्या.सर्व तयारी झाली होती आणि फोन आला.
भारत सरकारने युथ हाँस्टेलचा या वर्षीचा 'हर की धुन' हा ट्रेक रद्द केला आहे. युथ हँस्टेलचे ट्रेक रद्द होते नाहीत म्हणुन प्रथम आम्हाला 'एप्रिल फुल' करतात असे वाटले. सरकारने या विभागातील सुरक्षा व सुरक्षेच्या भीतीने या ट्रेकला कमी नोंदणी केली असे त्यांचे म्हणने आहे. तसेच त्यानी दुसर्या ट्रेकला जाण्य़ाची संघी दिली पण प्रवासाचे प्रश्न असल्याने आम्ही या वर्षी ट्रेकला जाण्याचे नाराजीने रद्द केले.
असो,या वर्षी बर्फाच्या वातावरणाच्या निर्सागात जाण्याची संघी चुकली आणि आम्ही सर्व मित्र नाराज झालो. हिमालयातील ट्रेकची संघी चुकली तर ते दु:ख सहन करण्यास ट्रेकरना त्रास होतो. पुढच्या वर्षाच्या संघीची वाट पाहत सह्यांद्रीत पाद्भ्रमण करीत राहु.
जमले तर आपणही या पुढच्या वर्षी आमच्या बरोबर हिमालयातील ट्रेकचा आनंद लुटायला.
1 comment:
अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " / आप भि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?
Post a Comment