अमेरिकेतले भुरळ घालणारे आयुष्य आणि आयटी मधले आकर्षक करियर सोडुन आपल्या 'देवरुख' या गावात विविधांगी सामाजिक काम करणारे सदानंद भागवत हे निराळेच व्यक्तिमत्व आहे.भागवतांच्या सामाजिक कामात आधीच आधाडिवर असणार्या कोकणातल्या देवरुखची यांच्यामुळे नवी ओळ्ख निर्माण झाली आहे. अमेरिकेत फक्त पाच वर्ष काम करुन नतंर जन्मभर घर चालवता येईल इतके पैसे कमवायचे आणि भारतात परतायचे, बाकी आयुष्य आवडत्या कामासाठी, हे इथुन जाण्यापुर्वीच ठरविले होते.त्याप्रमाणे लहानपणापासुन समाजसवेची आवड असलेल्या भागवतांनी सामाजिक कार्य जोरात सुरु केले आहे. त्यानी अमेरिकेतेही सामाजिक कामे केली आहेत. १५ आँगस्टचे निमित्त साघुन 'नेक्स्ट जनरेशन फाउंडेशन' स्थापन केले. भारतात उदभवणार्या नैसर्गिक व इतर आपत्तीचे बळी ठरलेल्याना मदत करणे,त्याच्यासाठी निधी गोळा करणे,गुतरातमघील जातीय दगंल,संहारक त्सुमानी,२६ जुलैच्या पावसाचे ताडव अशा संक़टांत या संस्थेने मदतीचा हात दिला. शाळेतुन आरोग्य शिबीरे ,शिक्षकांसाठी शिबीरे सतत घेत या कार्याला सुरुवात केली. इंग्रजी या जागतिक भाषेला आलेले महत्व माहीत असल्याने त्यांनी इंग्रजी माघ्यमाची शाळा देवरुखमघ्ये सुरु केली. सघ्या भागवत महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहेत.शहीद,अनाथ आणि गरीबांच्या मुलांसाठी 'राष्ट्रीय एकात्मता व जबाबदारी संकुल'उभारत आहेत.हे पुर्ण झाल्यावर मतिमंद मुलांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. 'राष्ट्र हा ईश्वर, राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा' आणि 'सामाजाने तुम्हाला घडवले,तुम्ही समाज घडवा' या मुलतत्त्वावर ही सामाजिक कार्य त्यानी हाती घेतली आहेत.त्याना या कार्याला यश येवो हीच सदिच्छा.
मंदीच्या लाटेमुळे परदेशातुन स्वग्रुही परतलेल्यांनी आपापल्या गावात जाऊन सामाजिक कर्तव्य म्हणुन थोडेतरी कार्य केल्यास समाजाची प्रगती होईल. स्थानिकानी देखील त्याच्या कामात सहकार्य केले पाहीजे.
भारतात परतून पुन्हा आपल्या मातीत रुजण्याची इच्छा बाळगणार्या अनिवासी भारतीयांनाही नवी उमेद मिळाल्यावाचून राहणार नाही. याच्या कडुन प्रेरण घेऊन प्रेत्यकाने समाजासाठी कार्य केलेच पाहीजे.
No comments:
Post a Comment