परवा आमच्या शेजारीच राहणार्या मुलगीच्या लग्नाला पुण्याबाहेर गेलो होतो. लग्नाला जाण्यासाठी बस ची सोय होती. उन्हाळा असुन देखील सोसाय़टीतील खुपश्या स्त्रिया नटुन थटुन निघाल्या होत्या. प्रवास मजा मस्ती व गाणी गात करीत पुण्याच्या पुढे 'नसरापुर' येथे दुपारी पोहचलो. आमचे स्वागत व मानपान केले गेले. लग्न साडे चार वांजता होते म्हणुन आम्ही जेवण करुन आराम केला. लग्नाची वेळ जवळ येऊ लागल्यावर पाहुणे मडंळी जमु लागली. आम्ही सर्व लग्नासाठी तयार झालो.वाजंत्री वाजु लागले.घोडयावर नवर्याला बसवुन घोडाल्या नाचवु लागले. पाहुण्यानी लग्नाचा हाँल भरला होता. खुपशी मडंळी हाँलच्या बाहेर होतो. आम्ही हाँलच्या बाहेर सावलीत उभे होतो.
नवरा नवरीला बोहल्यावर आणले गेले. मगंलाष्टके सुरु झाले. अक्षता टाकण्यास सुरुवात झाली. माझे लक्ष बाजुला उभे असलेल्या मुलीच्या वडीलाकडे गेले. ते लग्न लागण्याच्या समयी आत हाँलमघ्ये असायला पाहीजे होते. मला थोडे आश्चर्य वाटले. त शांत पणे खाली मान करुन उभे होते. मग मी त्याच्याकडे पाहत आहे ते त्याना कळले व त्यानी माझ्याकडे पाहिले. त्याची नजर मला वेगळीच दिसली.त्याच्या नजरेत मला दु:ख दिसले. मला खुप वाईट वाटले.त्यांच्या डोळ्याच्या कडा ओळ्या झालेल्या मी पाहील्या.
मगंलाष्टके सुरु होती. गर्दी बाजुला करीत मी त्यांच्या जवळ गेलो. एका हाताने अक्षता टाकत होत्या व दुसर्या हाताने डोळे पुसत होते. त्यांच्या खंद्यावर मी हात टाकला व सावरण्यासाठी शांत राहण्याची खुण केली.त्याना माझा आघार वाटला. तुम्ही दु:खी झालात ती पण दु:खी होईल याची काळजी घ्यावी. तीच्या समोर दु:ख व्यक्त करु नका असे बाजुला नेउन थोडक्यात सागितले.
त्यांच्याकडे पाहुन वडीलांचे दु:ख काय ते मी प्रथमच पाहीले. लहानची मोठी लाडात वाढविलेली मुलगी एका क्षणात दुसर्याची होउन जाते. वडीलांचे प्रेम मुलापेक्षा मुलीवर जास्त असते. प्रेमात वाढलेल्या आपल्या मुलीला कोणतेच सकंट येउ नये असे मुलीच्या वडीलांना वाटत असते. वडीलांचे प्रेम मुलापेक्षा मुलीवर जास्त असते. आपल्याला या भावनेसाठी मुलीचे वडील व्हावे लागेल. मुलीची आई पटकन दु:ख व्यक्त करु शकते पण वडीलाना दु:ख व्यक्त करणे खुप कठीण असते.या नात्याचे महत्व इतरांपेक्षा त्या दोघांनाच जास्त माहीती असते.
2 comments:
Kharay. Jawe tyachya wansha tenva kale.
आम्हि हि हा मन हेलावनारा प्रसन्ग अनुभवला आहे ... कैक लग्नान मध्ये... चान लिहले आहे ...
.
आपन्हि मुलिचे वडिल आहात काय?
Post a Comment