Thursday, May 14, 2009

स्वाईन फ्लू विषयी दक्ष राहावे.

स्वाईन फ्लूच्या साथीची व्याप्ती वाढायला लागली असून जागतिक आरोग्य संघटनेने पाचव्या टप्प्याचा धोक्याचा इशाराजारी केला आहे.आपल्या अवतीभोवती फ्लूचे विषाणू सततच असतात. पण त्या विषाणूंचा आपल्याला उपदव होत नाही; त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा असतो पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाळीव किंवा जंगली प्राण्याकडून एखाद्या व्यक्तीला आजार झाल्याची घटना घडू शकते. हा दुसरा टप्पा असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राणी किंवा माणूस यांच्याकडून लहानशा क्षेत्रातील व्यक्तींना आजाराची लागण होते. अशा आजाराच्या साथीची व्याप्ती एकाद्या समाजामध्ये पसरू लागली तर तो होतो चौथा टप्पा. एखाद्या समाजापुरती मर्यादित असलेली साथ देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशांत पसरू लागते, तेव्हा तो असतो पाचवा टप्पा! स्वाईन फ्लू या आजाराची साथ अनेक देशांमध्ये पसरली असल्याचे निश्चित झाल्यानेच जागतिक आरोग्य संघटनेने पाचव्या टप्प्याचा इशारा दिला आहे. ऑस्ट्रिया, कॅनडा, जर्मनी, इसायल, नेदरलँड्स, न्यूझीलंड, स्पेन, स्वित्झर्लंड आणि इंग्लंड-आयर्लंड येथे या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.ज्या देशांमध्ये हा आजार पसरला आहे,
त्या देशांमधून आपल्या देशात येणाऱ्यांची कडक पाहणी करण्यात येत आहे.सर्वांनाच या आजाराबाबत सावध राहायला हवे, असेही या संघटनेने स्पष्ट केले आहे.या आजाराच्या व्याप्तीचा वेग लक्षात घेता १९१८ साली आलेल्या आणि पाच कोटी लोकांचा जीव घेणाऱ्या स्पॅनिश फ्लूची आठवण येणे स्वाभाविक आहे. परंतु आता आयुविर्ज्ञान बरेच प्रगत झाले आहे. मात्र आपण कितीही प्रगती केली तरी त्यावर कुरघोडी करण्याची शक्ती जीवाणू आणि विषाणूंमध्ये आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे.
या विषाणुंच्या लढाईत आपणच यशस्वी होणार असलो, तरी निष्काळजीपणाने वागल्यास त्याची जबर किंमत आपल्याला मोजावी लागेल.जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यामागे असा खोलवरचा अर्थ आहे.

1 comment:

Prashant said...

विवेक,

तुमची लेखमाला पाहून आनंद वाटला.

जे थोडे फार देवनागरी लिहिण्यातले अडथळे आहेत, त्यात मुख्य म्हणजे ’र्‍य’ लिहिणे. इतर काही दुरुस्ती सुचवत आहे. शक्यतो दुरुस्त करून घ्यावीत. यासंदर्भात काही मदत लागल्यास जरूर कळवणे.

-- प्रशांत
----

उपदव उपद्रव
आयुविर्ज्ञान आयुर्विज्ञान
इशाऱ्यामागे इशार्‍यामागे