Tuesday, May 26, 2009

'सरोगसी'तून अपत्यप्राप्ती

'सरोगसी'तून अपत्यप्राप्ती करवून घेऊ इच्छिणारे पालक व त्यासाठी गर्भाशय देणारी व त्याचा मोबदला घेणारी स्त्रीयाच्यांतील हा आथिर्क देवाणघेवाणीचा व्यवसाय वाढत आहे.गर्भाशय भाड्याने देण्याचे-घेण्याचे प्रमाण आपल्या देशातही वर्षाला पाच-सहाशेवर पोहचले आहे.गुजरात मघल्या 'आणंद' या ठीकाणी एकाच कुटुंबातील दोन-तीन स्त्रीया या व्यवसायात आहेत.गरीबीमुळे ह्या प्रकारच्या व्यवसायात आणखी स्त्रीया सहभागी होतील. हे लक्षात घेऊनच त्यास अधिकृत मान्यता देण्यासाठी कायद्याचा विचार सुरू आहे.
अपत्यहीन दाम्पत्य व 'सरोगेट माता' यांच्यातील आथिर्क देवाणघेवाणीतही डॉक्टरांना स्थान असणार नाही.स्त्रीवादी संघटनांना मात्र सरोगेट मातांचा वा यातून जन्मणाऱ्या बालकांचा कायद्यात पुरेसा विचार झाला आहे असे वाटत नाही.या बालकाना अपंगवृत आले तर त्याच्या संगोपनासाठी अडचणी निर्माण झाल्यातर कायद्यात विचार करण्यात यावा. याला उघडउघड 'व्यवसाया'चे रूप येणे रोखणार कसे, असा सवाल समोर येत आहे. विदेशी नागरिकांनी गरजू भारतीय स्त्रियांची गर्भाशये पैसे मोजून अपत्यप्राप्तीसाठी वापरायची, हे जागतिक स्तरावरील असमानतेला खतपाणी घालणारेच नाही का? हाही मुद्दा उभा रहत आहे.गर्भाशय देणारी मातेचे शोषण,मोबादला दिला नाहीतर,अंपग़त्वव किंवा अय़शस्वी गर्भापण,बाळाचे मुलभुत ह्क्क या उद्भवणाऱ्या वादांचे काय? यातुन पुढे येणारे खुपसे प्रश्न अनुत्तरित राहीले आहेत.
अपत्यहीन जोडप्यासाठी 'सरोगसी'तून अपत्यप्राप्ती,हे एक वरदान ठरले आहे.पण गरजुनी याचा व्यवसायात रुपातंर करुन पैसा जमविला. त्यातून होणारया नैतिक,सामाजिक प्रश्नाचा विचार करुन कायदा मजुंर करावा.

1 comment:

Anonymous said...

यातिल पैसे हा मुद्दा वाजूला काढला आणि हे माझ्याकडे अधिक आहे की जे तुमच्याकडे नाही म्हणून मी देणे हा दृष्टीकोन दिला तर काही वेगळेच चित्र वाटते...
"दुडुर्ब्रम्हा दुडुर्विष्णु, दुडुर्देवो महेश्वरः" या वाक्याच्या अर्थ घटप्रभेचा योगी नामक पुस्तकात सुद्धा दिला आहे"