गेल्या काही वर्षापेक्षा यंदाच्या नाट्यप्रयोगाना चागंला प्रतिसाद मिळाला आहे.लहान मुलांना नाटकांची गोडी लागून ती थियटरकडे वळावी आणि त्यांच्यावर संस्कार व्हावेत हा बाल नाटक़ांचा हेतू आहे.वेगळा विषयव माडंणी मुळे प्रयोगाना चागंला प्रतिसाद मिळ्त असला तरी शासनाकडुन मदत मिळत नाही. बालनाट्याबाबतीत सरकार नेहमीच उदासिन दिसत आहे.बालरंगभुमी हीच उद्दाच्या रंगभूमीचा पाया असल्याने शासनाने आर्थिक मदतीने मजबूत करावा व यापुढे मे व दिवाळीच्या सुट्टीतील बालनाटकांचेप्रयोग जास्तीत जास्त सादर करण्यास सरकारने पुढाकार घ्यावा. स्पर्धा भरविल्या जाव्यात.तरच नवे नाटककार तयार होतील. उन्हाळ्या सुट्टीत लहान मुलांसाठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करुन त्यात मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे ह्याचा सर्व खर्च सरकारने करावा. बाल नाट्याचा विकास व्हायचा असेल तर शालेय पातळीवर नाटकांचे शिक्षण दिलेपाहीजे. बालनाट्याची चळवळ सुरु होण्यासाठी जेष्ट् नाटककारांनी ह्या साठी प्रयत्न करावा.
1 comment:
Balanatyacha hetu mulanna vichar karayala lavane ha asayala hava. To kvachitach disato. Balanatyanchi shibire ghenaryanpaiki bahutanshi lokanna 4 theatre games palikade kahi yet asate asa mazya baghanyat nahi.
Palakancha drushtikon hi atishay ghatak asato. Tyanna mulala stage var anayache asate ani tithe to kunachya tari najaret bharava va tyala kuthetari serial/ film madhe chance milava yapalikade tyanna interest nasato. aso...
Post a Comment