Friday, June 26, 2009

सोनुचे यश

मी सोनु ला फोन केला व तीच्या दहावीच्या निकालाची चौकशी केली. तीने आनंदाने ९३% मिळल्याची माहीती दिली.काही विषयातर पैकीच्या पैकी गुणांसाठी दोन तीने गुण कमी पडले आहेत. तिच्या ह्या आनंदात सहभागी होण्यास घरात कोणीच नव्हते. पण माझ्या फोनमुळे तिला खुप आनंद झाला. मनमोकळे करुन ती फोनवर रडली. मला खुप वाईट वाटले. मी तिला शांत करीत तिचे कौतुक केले.
सोनु लहान असताना तीचे वडिल तीच्या आईला व तिला सोडुन गेल्यानतंर काही दिवसांत आईने
स्वत:ला जाळुन घेतले होते आणि त्यातच तीचे निघन झाले.त्यानतंर तिचे संगोपन तिच्या काका
व काकुने केले.
सोनुने काकाच्या घरात राहुन घरातील कामे करुन व हाल सहन करीत अभ्यास केला.
अश्या या परीस्थितीत सोनुने शाळेच्या मदती शिवाय कोणाचीच मदत नसताना देखील तीने हे यश मिळविले आहे.
तिचे हे यश साजरे करायला जवळ कोणीच नव्हते. तिच्या आईबाबा आता असते तर तीला खुप आनंद झाला असता. तिने बरोबरच्या मुलांचे होणारे लाड व पालकांची मुलांसाठी चाललेली धावपळ पाहुन काय वाटले असेल? तिला कीती वाईट वाटले असेल?
यापुढे काका काकु तीचे शिक्षण बंद तर नाही ना करणार ही भीती तिला वाटत होती? तिला खुप शिकावयाचे आहे पण तिची ही इच्छा पुर्ण होईल ना?

2 comments:

HAREKRISHNAJI said...

Please convey my congratulations to Sonu

bhaanasa said...

सोनुचे अभिनंदन!! इतक्या खडतर परिस्थितीतही तिने न डगमगता हे यश मिळवलेय.gr8.