Thursday, July 2, 2009

रेल्वे प्रवाशांनी गुन्हे करु नयेत.



आयत्या वेळी गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलणारी रेल्वे व पुलांवरील गदीर्तील धक्काबुक्कीचा अनुभव घेण्यापेक्षा रूळ ओलांडण्याचा धोका अनेक जण पत्कारतात.महीलाही यात मागे नसतात.वाढते रेल्वे प्रवासी व बहुसंख्य रेल्वे स्टेशनांवरील पुलांचा आकार पुर्वी सारखा पुरेसा वाटत नाही.रूळ ओलांडण्यामागे पूल चढण्याचा त्रास वाचवणे. घड्याळाची कट्यावर घावणार्या मुंबईत नेहमीच सर्वच रेल्वे प्रवाशी रूळ ओलांडतात. हा गुन्हा असुन देखील रेल्वे स्टेशनांच्या परिसरात सर्रास असंख्य लोक हा 'गुन्हा' करताना दिसतात.अपघातात जीव गमावण्याची वा अपंग म्हणून आयुष्य काढण्याची पाळी येऊ नये, यासाठी रेल्वेने रूळ ओलांडण्यास मनाई केली आहे आणि ती प्रवाश्यांसाठी हिताचीच आहे. पण हे बंधन न पाळण्यात 'अनैतिक' काही आहे, असे कोणालाच वाटत नाही आणि त्यामुळेच रूळ ओलांडणाऱ्यांकडे गुन्हेगाराच्या दृष्टीने कोणी पाहत नाही. दंड व तुरुंगवास ह्या शिक्षा कोर्टानेदिल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने हा गुन्हा करणार्या तुरुंगवासाने काही जरब निर्माण करता येते का, हे आता आजमावून पाहिले जात आहे. नुकतेच एका प्रवाशाने तीन दिवस तुरुंगात काढले आणि या अनुभवानंतर आयुष्यात पुन्हा रूळ ओलांडण्याचे तो धाडस होणार नाही.कुटुंबावर होणाऱ्या त्याच्या विपरीत परिणामांची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधनाचे खास प्रयत्न करून या वर्तनापासून लोकांना परावृत्त करण्यावर रेल्वेचा भर आहे.काही ठिकाणी समाज सेवक व संस्थारेल्वे रुळ ओळाडंणार्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन आपल्या कुटुंबासाठी तरी हा गुन्हा परत करु नका अशी विनंती करत आहेत. कुटुंबावर होणाऱ्या त्याच्या विपरीत परिणामांची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधनाचे खास प्रयत्न करून या वर्तनापासून लोकांना परावृत्त करण्यावर रेल्वेचा भर आहे. वाढत्या अपघातांचा विचार करता प्रवाशांनी कोणीही समजावण्या अगोदर स्वत:हुन रुळ ओलाडंणे बंद केले पाहीजे. थोड्याश्या वेळेसाठी आयुष्यात मोठ्या जोखीमा का पत्करतात?

No comments: