
उशिर झाल्यामुळे मी घाई घाईत चालत आँफिसला निघालो होतो.गाडी पकडण्यासाठी माझी धावपळ होती. लांब रस्तावर काही तरी पडलेले दिसत पाहीले पण बारकाईने न पाहता मी माझ्या तंद्रीत चालत होतो. जेव्हा जवळ आलो तेव्हा पाहीले तर एक कुत्रा रस्त्यावर मरुन पडलेला दिसला. थोड्यावेळापुर्वीच गाडीने त्या कुत्र्याला धडक दिली होती. बाजुला रक्त सांडले होते व तो निपचित पडला होता. असे कीतीतरी कुत्रे अश्या पध्दतीने रस्तावर मरुन पडलेले दिसतात.
त्या मेलेल्या कुत्र्याला डावळुन गाड्या बाजुने सावकाश पुढे जात होत्या. त्या कुत्र्याच्या बाजुला एक मोठा कुत्रा बसलेला दिसला. बाजुने गाडी पुढे गेली कि तो त्या गाडीवर भुंकायचा व गाडीवर घावत जायचा. त्या भुंकणार्या कुत्र्याची घाळ्मेल पाहुन माणसे जमा होउ लागली. ती मेलेली कुत्री होती ते जवळ गेल्यानतंर सर्वाना कळले. तो कुत्रा तीच्या जवळ जाऊन तीच्या कडे पाहत उभा राहयाचा. मघ्येच कावळे त्या कुत्रीला बोचायला येत त्याना ही तो उडवुन लावीत होता. त्याला ती थोड्यावेळात उठेल या आशेने तीला उठवत होता व तीला भुंकुनु उठण्यास सागंत होता.त्याची धावपळ व व्याकुळता पाहुन सर्वाना खुप वाईट वाटत होते. तो खुप धावला व ती उठत नाही म्हणुन शांत होउन तीच्या बाजुला जाउन बसला.
खुप माणसे जमली.वाहतुकीचा गोंधळ होउ लागला.एक गृहस्थ पुढे होत कुत्र्याकडे जाऊ लागला. तो कुत्रा गुरगुरत त्या माणसावर घावत आला.तो माणुस लांब पळुन गेला. कुत्रा परत त्या कुत्री जवळ जाऊन वास घेऊन तीच्या भोवती फेर्या मारु लागला.त्या कुत्र्याच्या वागणुकीने,त्याने त्या कुत्रीवर खुप प्रेम केलेले दिसले.झोपलेली जागी व्हावी असे त्याला वाटत असावे. इतक्यात त्या कुत्र्याला ओळखणारा एक इसम त्या ठीकाणी येऊन परीस्थीती पाहून त्याने त्या कुत्र्याला हाक मारली. त्या कुत्र्याने त्या माणुसाच्या कडे घाव घेतली व त्याच्या अगांवर उड्या मारु लागला. त्या कुत्र्याने त्याला कुत्रीकडे ओढत आणले व त्याच्या अंगाला बिलगला. तो सिन पाहुन सर्वाना खुप वाईट वाटले. मुके जनावर आपले प्रेम कसे व्यक्त करु शकतात ते दाखवुन दिले. सर्वजण त्या कुत्र्याचा प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार पाहुन भारावुन गेले व तो सर्व प्रकार शांतपणे पाहत होते. त्या माणसाने जसे माणसाचे सांत्वन करतात तसे त्याने त्याला गोंजारुन सांत्वन करुन त्याला शांत केले. तो कुत्रा शांत झाल्यावर त्याने त्या कुत्रीला रस्त्यावरुन उचलून बाजुला नेले. कुत्राही त्याच्याबरोबर गेला. कुत्र्याचे सर्वाना वाईट वाटत होते. वाहतुक सुरु झाली व माणसे वेगळ्याच मनस्थीतीत पागंली. पण त्या कुत्र्याचा अक्रोश कायमचा त्याच्या लक्षात राहील. मुक्या जनावरांचे एकमेकांवर प्रेम असते ते सर्वानी जाणले.
1 comment:
Very touching article.
I am seeing the decay of human values in our society everyday. Animals still posess the
pure soul.
Thanks for the article.
Post a Comment