
अनियमीत पावसामुळे यंदा खरीपाच्या पेरणीला विलंब व काही पिकांखालिल क्षेत्रात घट झाल्याने उत्पादन कमी होण्याची आणि त्यातून महागाईचा भस्मासूर आणखी बोकाळण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.देशाची आर्थिक क्षेत्रातील वाटचाल समाधानकारकपणे चालू असतानाच पावसाने दगा दिल्यामुळे देशापुढील अडचणींचा पाढा पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसू लागली आहे. काही ठिकाणी तर पुन्हा पेरणी करावी लागल्याने शेतकर्याचे नुकसान झाले.खरीपाचे पिक रेगांळल्याने रब्बी पिकांवरही दुष्परिणाम होतील.कमी पावसामुळे खुपश्या घरणांमघ्ये पाण्याचा पुरेसा साठा झालेला नाही.अपुर्या पाण्याने रब्बी पिके लावली तरी जातील का? भविष्यात पूरेसे अन्नधान्य उपलब्ध न झाल्यास अन्न टंचाईला तोंड द्दावे लागेल्.देशात अन्नधान्याचा जो काही साठा आहे, तो योग्य भावात व योग्य प्रमाणात लोकांपर्यंत पोहचेल हे सरकारच्या पुरवठा विभागाने पाहणे आवश्यक आहे.आताच साखर व तुरडाळीची टंचाई भासू लागल्याने सरकार ही टंचाई दुर करण्यासाठी साखर व तूरडाळीचे आयात सुरु करीत आहे. आयात केलेले अन्नधान्य आपल्या वाढत्या लोकसंख्येला कीती दिवस पुरेल? अन्नधान्य आयातीत मोठे गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने सरकारने जागरूक राहून हे व्यवहार करावे लागतील. त्याचप्रमाणे साठेगिरीवर निर्बध घालुन सरकारला शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे योग्य नियोजन करुन पुढिल पिके तयार होईपर्यत अन्नधान्य पूरवावे लागेल. योग्यपणे व्यवस्थापन केले तर या संकटाची झळ फारशी जाणवणारही नाही.
हे माझे पत्र १२ आँगस्टच्या 'लोकमत' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे.
1 comment:
योग्य सोडाच पण निदान थोडफार तरी नियोजन सरकारने केले असते तर अन्नधान्य, दुष्काळ आणि सध्याचा स्वा इन-फ्लू आणि असे असंख्य विषय आज इतक्या गंभीर स्वरूपात आपल्या पुढे उभे थकले नसते.
Post a Comment