Wednesday, August 26, 2009

'आयपिल्स' स्त्रीरोगतज्ज्ञांन्याचे सल्ल्यानेच.


दरवर्षी भारतात ५० लाख असुरक्षित अँबॉर्शन्स होतात आणि एकूण गर्भधारणांपैकी ७८ टक्के अनियोजित असतात. त्यामुळे ही साधनं सहज उपलब्ध करून द्यावीत असे र्वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे निदेर्श आहेत.नेहमीची गर्भनिरोधक साधनं काही कारणाने वापरता आली नाहीत किंवा निरुपयोगी ठरली तर संबंधांनंतर ७२ तासांच्या आत इमर्जन्सी काँट्रासेप्टिव वापरली जातात.टीव्हीवरच्या आक्रमक जाहिराती नतंर भारतात तब्बल २ लाखांहून अधिक 'आयपिल्स' दरमहा विकल्या जातात तर 'अनवाँटेड ७२' चा खप गेल्या एप्रिलपासून दरमहा ५० टक्क्यांनी वाढतोय असं खुद्द त्या कंपनीचे माकेर्टिंग डायरेक्टर सांगतात, यावरून या गोळ्या घेण्याचं वाढतं प्रमाण वाढत आहे हे कळते.विवाहीतांपेक्षा अविवाहीत तसेच तरूण मुलींनी या गोळ्याचे सेवन सुरु केले आहे.हे सगळं स्त्रीरोगतज्ज्ञांन्याचे मते धोकादायक आहे. या गोळ्या केवळ इमर्जन्सीमध्येच घेण्यासाठी आहेत, या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीकडे महिलांचं दुर्लक्ष झाल्याने गंभीर तक्रारी घेऊन येणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढत आहे.या गोळ्या जास्त सेवनाने कधीच गर्भधारणा न होण्याची शक्यता वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.अविवाहित मुलींसह विवाहित महिला सुशिक्षित असल्या तरी या गोळ्यांच्या वापराबद्दल घोर अज्ञान आहे.जाहिरातींमध्ये त्या कशा आणि कधी वापरायच्या हे सांगितलं जातं. मात्र अति वापरामुळे काय दुष्परिणाम होतात हे सांगण्याचं कायदेशीर बंधन मात्र उत्पादकांवर नाही.जाहिराती करताना या औषधांच्या वापरातील धोके सांगणं सक्तीचं करायला हवं किंवा या जाहीराती तरी बंद कराव्यात.

1 comment:

Mahendra said...

I agree your views completely..
Please check this..
http://kayvatelte.wordpress.com/2009/07/25/कॉंट्रासेप्टीव्ह्ज/