Tuesday, September 1, 2009

मराठी चित्रपटाचे वेगळे दालन असावे.

मुबंईत भारतीय सिनेमांचे आतंरराष्ट्रीय दर्जाचे म्युझिअम फिल्म्स डिव्हीजन तर्फे उभारले जाणार आहे.या म्युझिअम मघ्ये हिंदी भाषेच्या सिनेमांबरोबर मराठी भाषेतील सिनेमांचा इतिहास व विकास प्रदर्शित करण्यास वेगळे दालन असावे. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाची आर्कषक माडंणी करून मराठी सिनेमा आँस्कर पर्यत पोहचला याची माहिती प्रसिध्द करण्यात यावी. श्रेष्ट दिर्ग्दशक,कलाकार,संगीतकार यांचीही माहीती प्रदर्शित केल्यास कर्तृत्व गाजवणार्यांचा सन्मान होईल. सुरुवातीला काही काळ मराठी चित्रपट सृष्टी ग्रामिण विषयातुन बाहेर येत नव्हती पण आता तीने चागंला वेग पकडुन भरधाव सुटली आहे. गतकाळात कोणत्या परीस्थीतीत सिनेमे चित्रीत केले जायचे ते पुढच्या पीढीला पाहायला मिळेल अशी सोय करावी.
मुबंईतील होणार्या म्युझिअम मघ्ये मराठी चित्रपट सृष्टीचा दालनाचा समवेश केला तरच म्युझिअम पर्ण झालेले वाटले.
हा माझा लेख २९/८/२००९ रोजीच्या 'महाराष्ट्र टाइम्स' मघ्ये प्रसिध्द झाला आहे.

1 comment:

निनाद गायकवाड said...

अतिशय उत्कृष्ट प्रयन्त. अणि पत्र प्रसिद्ध झाल्या बद्दल अभिनन्दन !!!