
परवाच नातेवाईकांसहीत पनवेल(कर्नाळा)येथे एका रिसोर्टवर जमून माझा वाढदिवस मजेत साजरा केला.
परदेशातून सुट्टीवर आलेला माझा लहान भाऊ कुटुंबासाह हजर राहणार होता. सकाळपासून मडंळी जमत होती. या सर्वजणात माझ्या भावाची लहान मुलगी ' सखी ' या कार्यक्रमासाठी मोठी उत्साही होती.खुप दिवसापासून ती या कार्यक्रमाची वाट पाहत होती.यासाठी तीने तयारीही केली होती.
तीने अदल्या रात्री बारा वाजंता मला उठवून शुभेच्छा दिल्या होत्या.
सखी ही मस्तीखोर,राग आल्यावर फुगुन बसणारी गोड मुलगी आहे.आमच्या सर्वात ती लहान असल्याने सर्वाची लाडकी व सर्वाना हवीहवीशी वाटणारी आहे.
मी तीची वाट पाहत होतो. ती आली नव्ह्ती. तीने येऊन मस्ती करीत सर्वासह मजा लुटावी असे आम्हाला वाटते होते.
तीच्या पोटात दुखत असल्याने ती अपसेट होती. तीची तब्तेत ठीक नसल्याने तीला आणता आले नव्हते.
मला वाईट वाटले.
काही वेळाने फोनवर भावाने सखीला डाँक्टरला दाखवून कार्यक्रमासाठी घेऊन येत आहे ते कळल्यावर आनंद झाला. ताबडतोब हजर मडंळीने केक कापण्याचा कार्यक्रम सखी आल्यावर करण्याचे ठरविले.
तरुण मडंळीने स्विमिंग टँकमघ्ये उड्या मारल्या व मोठी मडंळी गप्पा गोष्टींमघ्ये रगुंन गेले.
थोड्या वेळाने भाऊ सखी ला घेऊन आला.आम्हाला आनंद झाला.स्विमिंग टँक, तीचा विकपाँईट असल्याने तीला खुप ढमाल करायची होती.पण आज तिला स्विमिंग टँक मघ्ये उतरण्याची बंदी होती.ती सरळ स्विमिंग टँकवरच आली आणि थबकली.काय माहीत नाही पण तीला पोटत दुखले की पाण्यात उतरण्याची बंदी म्हणुन ती बावरली व नतंर सावरली. बागडणारी मुलगी मलून झाली होती.तिच्या चेहर्यावर उदासी दिसली. मी पाण्यातून बाहेर येऊन तिची विचारपूस केली व तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होतो. पण ती हिरमुसली होती. आम्हाला तिच्या समोर पाण्यात मजा करण्यास वाईट वाटत होते.सखी सह सर्वानी पाण्यात मजा करण्यास मजा आली असती. तीला एका कोपर्यात आईच्या शेजारी शांत बसलेली पाहवत नव्हते. पण ती पाण्यात जाण्याचा हट्ट करीत नव्ह्ती. नेहमी ह्ट्ट करणारी मुलगी आज ती शांत होती.पण नाराज होती. तिला कसे काय खुष करायचे याचा विचार करीत होतो. माझ्या वाढदिवसाला कोणीच दु:खी नसावे असे मला वाटत होते. इतक्यात माझ्या आईने तीचे मन दुखवू नये म्हणुन तीला टँक कडेला पाण्यात पाय बुडवून बसविले.
आता मात्र ती खुष झाली.रुसवा गेला.सर्वाना माझ्या अगांवर पाणी उडवून नका असे सागुंन ती इतर लहान मुलांसह खेळु लागली. तिला पाण्यात जे काय मजा करायची होती ते इतराना करावयास सांगत होती व स्वत: अनुभवत होती. मजा करता येते नव्हती म्हणुन कोणशी भाडंत नव्ह्ती कोणला दोष देत नव्ह्ती. मोठ्या माणंसासारखी समजुदार झाली होती. असला समजुदारपणा खुपवेळा मोठ्या माणंसांकडे दिसत नाही. थोड्यावेळाने मी तिला सोबत घेऊनच केक कापण्याचा कार्यक्रम केला. केक कापून प्रथम तिला केक भरवूनच खुष केले.
असे कार्यक्रम विशेषत: लहान मुलांनीच मजा करण्यासाठी आखले जातात. पण त्यानाच जर मजा करता आली नाही तर मनाला दुख होते. तिच्या कडुन काही शिकवण घेउन आम्ही आनंदात घरी परतलो.
No comments:
Post a Comment