Sunday, September 13, 2009

असा नेता महाराष्ट्रात का नाही?


आंध्रप्रदेशात डाँ.वाय एस.राजशेखर रेडडी यांनी ग्रामीण जनतेला सोबत घेऊन काँग्रेसची सत्ता आणली होती.त्यांनी राज्यहितासाठी अनेक योजना आखून त्या राबविल्यामुळे जनसामान्यांचा विश्वास संपादन केल्याने ते निवडणुकीत कधीच पराभूत झाले नव्ह्ते.

ग्रामीण जनता व पक्षाचे कार्यकर्ते हिच त्याची राजकीय शक्ती होती.अश्या या नेत्याच्या अपधाती निधनाच्या मानसिक धक्याने काही जणाचा मृत्यु झाला तर आपला नेता गेल्याने आता जीवनात काहीच स्वारश्य न उरल्याने साठ जणानी आत्महत्या केल्या. राजशेखर रेड्डी गेल्याची बातमी आली आणि संपूर्ण आंध्र शोकसागरात बुडाला. आपला नेता गेल्याच्या वृत्ताने खचून जाऊन कार्यर्कत्यांनी धडाधड आत्महत्या करायला सुरुवात केली.

नेत्याच्या मरणानतंर त्याच्यावरील प्रेमाखातर एवढ्या मोठ्या संख्येने आतापर्यत कधीच कोणी आत्महत्या

केल्याचे एकिवात नाही.

एवढा सामान्य जनतेच्या समश्या सोडविणारा की ज्यावरून जीव ओवाळुन टाकावा असानेता व सामाज कार्यात स्वत:ला वाहुन घेणारा नेता,महाराष्ट्रात का नाही? यापुढे कधी होईल का?

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या गडबडीत उमेदवारी न मिळालेल्याने तर बंडखोरीचे नेतेच वाढत आहे.


वाय. एस. राजशेखर रेड्डी हे 'जनतेचा राजा' होते.त्यांनी राज्यहितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे, राबवलेल्या योजनांमुळे आंध्रातल्या जनतेनेही त्यांना आपापल्या हृदयात मानाचं स्थान दिलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कामातून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम प्रशासक आणि सवोर्त्तम नेता अशी ओळख निर्माण केली होती.दुष्काळग्रस्त परिसरात जन्मल्याने लहानपणीच शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदनांशी जवळून परिचय झाला. दुष्काळ, कर्जबाजारीपणातून होणारी शेतकऱ्यांची होरपळ त्यांनी जवळून पाहिली. याच वेदनांच्या धगीतून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्व त्यांना माहीत होतं. काँग्रेसचे युवा आमदार म्हणून त्यांनी सिंचनाच्या मुद्यावर अनेक आंदोलनं उभी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्ानची त्यांना जाण होती. त्यांची उत्तरही त्यांना ठाऊक होती. पण त्याही पलिकडे शेतकऱ्यांची वेदना जाणणारं संवेदनशील मन असल्यामुळे 'रयथू बिड्डा' अर्थात 'भूमीपुत्र' हे बिरूद त्यांच्याकडे चालत आलं. वायएसआर यांची राजकीय कारकीर्द २५ वर्षांची. प्रत्येक पावलावर ते रचनात्मक कार्याची एकेक वीट रचत गेले. आक्रमकता आणि रचनात्मकता यांचा अफलातून मेळ त्यांच्या राजकीय प्रवासात दिसला. कर्तृत्वामुळे विजयश्री त्यांच्या पाठोपाठ चालत आली. कडप्पा या मतदारसंघातून ते चार वेळा लोकसभेवर निवडून आले. पुलवेंडूला या विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी चारवेळा प्रतिनिधीत्व केलं. लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसनेते म्हणून त्यांनी आंध्रप्रदेशात काँग्रेसची लोकप्रियता शिखरावर नेली. म्हणुनच

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे सरचिटणीस आणि युवा नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बेगमपेठेत शुक्रवारी सकाळी वाय एस राजशेखर रेड्डी यांचे अंत्यदर्शन घेतले.

असा हा अफाट कार्य करणारा गरीबांचा थोर नेता महाराष्ट्रात होण्याची शक्यता दिसत नाही.


3 comments:

Anonymous said...

marathi loka madhe khekda attitude khup ahe.

Mahendra said...

वाय एस आर नक्कीच एक मोठे नेते होऊन गेले यात काही वाद नाही. पण त्यांच्या साठी इतक्या लोकांनी आत्महत्या केली हे मला पटत नाही. आत्महत्यांच्या बातम्या तर त्यांच्या मृत्युपुर्वी पण येत होत्याच.. फरक इतकाच होता, की ते सगळे शेतकरी होते. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कव्हर अप करण्यासाठीच हया सगळ्या आत्महत्या वाय एस आर यांच्या मृत्युमुळे केल्या आहेत असे दाखवले गेले असावे मिडीयाला.
मला एक कळत नाही, वाय एस आर सारखे संपुर्ण मुख्यमंत्री असतांना पण आंध्रा मधे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रापेक्षा जास्त कशा??
सगळे नेते शेवटी सारखेच..

Anonymous said...

Absolutely rediculous, You must not have read the news aftermath. The ' Sakshi' news channel was after all this drama of publishing the news of so called suicides and so called deaths of people who loved the late CM. The truth was that all these deceased's relatives were paid rs. 5000 to rs. 15000 just to say that the death was due to the shock of death of the CM. Channel 'Sakhshi' is owned by the son of late CM i think his name is Jagmohan or so. That was a plot to creat pressure on congress highcommond to declare the son of late CM as the heir to the throne. Of course everything has gone in vain and the truth is on board. Just imagine some children of age ranging between 7 to 10 either committing suicide or suffering heart attack by listening the news of death of YSR, and also there are quite a number running in tens of the death who are more than 70 yrs. Tell me, where has all this hysteria gone now?