Monday, September 21, 2009

माझी फजिती झाली.

काकांच्या पच्च्याहत्तरीवर त्याच्या जीवन प्रवासावर एक व्हिडियो फिल्म काढायची कल्पना काकांच्या मुलाने काकांना न सांगता माडंली.व तो त्या कामाला सुध्दा लागला. जुने फोटो,दाखले,जुने सदंर्भ,जुने सपंर्क याची जमवाजमव सुरु झाली. त्याने सर्व परीचितांचे काकांसबधीची मते व जुन्या आठवणी चित्रीत करण्याचे ठरवून सुरुवात केली.त्या परिचितांमघ्ये नेमके माझेही नांव असलेले कळले. चार दिवसानी काकांच्या मुलानी मला 'मी तुझे मत चित्रीत करण्यासाठी येत आहे'असे कळविले.मी मग मनात काकांबद्द्लचे काही मुद्दे ठरविले व विसरु नये म्हणुन पेपरवर उतविले. कसे बोलायचे ते ठरवून मी त्याची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात तो हजर झाला.चहापाणी व गप्पा झाल्यवर कामाला सुरुवात झाली. त्याने कँमेरा काढला व चित्रण करण्याची तयारी करीत मला तयार राहण्यास सांगितले. त्या क्षणी मी नर्व्हस झालो.मी अजुनपर्य्त कधीच कँमेरा समोर बोललो नव्ह्तो.हा मला नविन अनुभव होता. मला सावरण्यासाठी मी काकांसबधी काही मुद्दे पेपरवर लिहिलेले त्याला दाखवले व त्याने वाचून ते मान्य करून मला बोलण्याची सुचना देऊन चित्रणाला सुरुवात केली. मला काही केले बोलता येत नव्ह्ते.तो पण चकीत झाला. त्याने शांत राहुन मला पाठ करून ते बोलण्यास सांगितले. त्यामुळे माझा आणखी गोधंळ झाला. सुरुवात करून मघ्येच मी अडखळत होतो. त्याला चित्रण थांबवावे लागत होते. सर्वजण माझी फिरकी घेत मजा लुटत होते.
आता मला कळले कँमेरासमोर बोलणे किंवा अभिनय करणे किती कठीण असते.आपण कितीतरी वेळा कलाकारांच्या अभिनयाबद्धल तोंडसुख घेत असतो.त्याना हिनवतो व त्याची टेर ही उडवतो. त्याला अभिनय करता येत नाही, त्याने शिक्षण घेतले पाहीजे असा शेरा आपण केव्हाही सह्ज मारतो. पण आता आपल्यावर वेळ आल्यावर कळते अभिनय काय असते. तेव्हापासून मी कोणाही कलाकाराची चेष्टा व टेर न उडविण्याचे नक्की केले.माझी चुक मला कळली.
काकांच्या मुलानी नतंर आम्हाला गप्पा मारण्यास सांगितले. तेव्हा मी माझ्या आईबाबा सोबत गप्पा मारीत असताना त्यानी आमचे चित्रण केले .काकांविषयी आमची मते त्यानी नेमकेच टिपुन घेतले.तेव्हा माझी सुटका झाली.
ते चित्रण त्यानी नतंर आम्हाला दाखविले ते पाहुन बातम्या देण्यासारखे क़ँमेरा समोर बोलण्यापेक्षा हे चित्रण चागंले झाले होते. अगोदरच ठरवून दिलेले डाँयलोग बोलुन प्रतिक्रिया सागंण्यापेक्षा उत्सर्फुत माडंलेली मते चांगली टिपता आली. तो खुश होउन परतला पण माझी मात्र फजिती झाली.

No comments: