ब-याच वर्षानतंर स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेने क्लेरीकलच्या अकरा ह्जार पदासाठी देशातून अर्ज मागविले होते. देशातून त्यासाठी ३६ लाख इच्छुक उमेदवारानी अर्ज भरले आहेत. एवढ्या उमेदवारांची परीक्षा तीन दिवसात वेगवेगळ्या वेळेला घेतेली जाणार आहे. महाराष्ट्रातील अकराशे पदासाठीही मोठ्या संख्येने अर्ज पाठविले. मंदी व नोकर भरतीवरील बंदीमुळे या जाहीरातीला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उच्च शिक्षितांनी जास्त अर्ज भरलेले आहेत. आथिर्क मंदीमुळे बेकारी व बेकारीमुळे मंदीत वाढ असे हे दुष्टचक्र आहे. या मंदीचे परिणाम सर्व अर्थव्यवहारावर होत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या आथिर्क धोरणांची भारतात सुरुवात केली. गेली जवळपास दोन दशके या आथिर्क धोरणांचा बागुलबुवा उभा करण्यात अनेक कामगारविरोधी पावले केंद व राज्य सरकारने टाकली.
महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत विविध पक्षांनी उमेदवार उभे करताना कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे. निवडणुकीतील प्रचारात आथिर्क मंदी आणि त्याचे कामगारांवर भावी काळात होणारे परिणामाचे मुद्दे मांडले जात नाहीत.
प्रत्येक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात तरुणाना नोक-या देण्याचे आश्वासन देतील.पण या बँकेच्या भरतीत जर महाराष्टातील सर्व पदे फ्क्त मराठी उमेदवारानांच मिळ्वून देण्याचा प्रयत्न कोणातरी पक्ष करील का?
लोकांच्या नोक-या जात आहेत.बेकारी आणखी वाढत आहे.
बेकारी दुर करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment