झिंबाब्वेमध्ये त्या दरम्यान एड्स अक्राळविक्राळ वेगाने पसरत होता. याचं कारण अंधश्रद्धेमध्ये दडल्याचं ध्यानात आलं. एड्सग्रस्त पुरुषानं कुमारिकेशी संबंध ठेवले तर तो रोगमुक्त होतो, असा समज पसरला आणि कोवळ्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण वाढलं. हजारो मुली देशभर बळी पडू लागल्या. यातनं अगदी रांगत्या मुलीही सुटल्या नाहीत. अशा मुलींना कुटुंबातही आधार नसे. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जाई. समाजभयास्तव गप्प बसवलं जाई एवढंच नव्हे तर एड्सग्रस्त बाप बरा व्हावा म्हणून स्वत:च्या मुलीला त्याच्या दावणीला बांधणाऱ्या आयाही होत्या. यातून शरीर मनावरच्या जखमांबरोबर एड्सची भेटही मिळालेल्या मुली वर्ष सहा महिन्यात मरणाची वाट चालू लागायच्या.अंधश्रद्धा आणि वासनांमध्ये होरपळणाऱ्या असहाय्य मुलीना केवळ औषधोपचारच नव्हे तर त्या धक्क्यामधून बाहेर येण्यासाठी मानसोपचारही केले पाहीजे.
कीती भयान अवस्था आहे येथील जनतेची.कोणी ही अंधश्रध्दा पसरवली असेल? कशी माणसे असतात?आणि कशासाठी असेल? पण त्याचा त्रास समाजातल्या कोणत्या गटाला सहन करावा लागत आहे. या अधंश्रध्देने पुढची पिढी एड्स हा रोग घेऊनच जन्माला येणार आहे. कीती रोगी या अधंश्रध्देमुळे आजारमुक्त झाले आहेत? कीती रोगी या अधंश्रध्देमुळे आजारमुक्त झाले असतील? पण हा अन्याय असाच सुरु राहणार का?
1 comment:
hya ashya andhashraddha apalya bharatat hi thaan mandun hotya atta atta paryant. ajunahi gramin kinwa aadivasi bhagat ya pratha chalu asalyas aashcharya nahi.
Post a Comment