आँफिसमघ्ये असताना दुपारी नातेवाईकांने फोनवर 'रोहीत'चे रेल्वे अपघातात निधन झाले,एवढेच कळविले. ही वाईट बातमी एकुन मी सुन्न झालो.काय करायचे हे कळत नव्ह्ते.काहीच सुचेना. माझे आँफिसमघले सहकारी विचारु लागले.त्याना सांगितल्यावर सर्वजण हळहळले. वरीष्ठाना माहीती देऊन मी आँफिसमघुन निघून सरळ रोहीतच्या घरी पोहचलो.घरात त्याच्या आईचा आक्रोश ऐकवत नव्हता. खुपसे नातेवाईक जमले होते.शांत होते.प्रत्येकजण वेगेवेगळे सांगत होते.कोणालाच प्रत्यक्षात काय घडले याची माहीती नव्हती. काही वेळाने रेल्वेची पूर्तता झाल्यावर त्याची मृतदेह आणली.सर्व विधी झाल्यावर सर्वजण सांत्वन करुन निघुन गेले. पण त्या घरावर मात्र शोककळा पसरली.
रोहीत वीस वर्षाचा तरुण मुलगा इजिनीयरीग़ंच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. लहान असल्यापासून तो जास्त कोणात मिसळत नव्हता.त्याला मित्र मैत्रीणी नव्ह्त्या.तो मीतभाषी असून एकालकोंडा होता. त्याला विचारलेल्या प्रश्नाचे तो फक्त उत्तर देत असे.स्वत:हुन तो बोलण्यात पुढाकार घेत नव्हता. तो नेहमीच स्वत:च्याच विश्वात असायचा.मनासारखे झाले नाही की खुप चिडायचा.थोडे काही आई बरोबर संभाषण होते. लहान असल्याने आई त्याच्यात भोवती फिरत असायची.त्याच्या अशा वागण्याने त्याची आई काळजीत असायची. शिक्षणात तसा ठिक होता.बारावी नतंर त्यानेच दादासारखे इंजिनीयरींला जाण्याचे ठरविले. धावपळ करुन प्रवेश मिळविले व नतंर तो सेमिस्टर पार करीत गेला. पण तो अभ्यासात काही रमला नाही. अभ्यास करायचा म्हणुन करीत होता.प्रोफेसरशी कधी जमले नाही की काँलेजला जात नसे. काँलेजमघ्ये शेवटी शेवटी मात्र वेळेवर जायचा.तो कोणाकडे बोलत नसल्यामुळे तो काय विचारकरतो याचा थांगपत्ता लागू देत नव्हता. पण त्याच्या अडचणी कोणाजवळ बोलत नसल्याने त्याचे काय आणि कोठे बिनसले आहे ते कळत नव्हते. आई बाबा विचारल्यावर उडत उडत माहीती द्यायचा. त्यानी व काँलेजनी काँन्सिलिंग केले पण उपयोग झाला नाही. त्याची शरीरयष्टी चागंली होती.जाँगींग व स्विमिंग करायचा.बाबा त्याला नियमीत स्विमिंगला घेऊन जायाचे. दादा पुण्यात राहायचा पण त्याच्याकडेही तो केव्हा गेला नाहीकी काही गोष्टी शेअर केल्या नाहीत.दोन्ही काकांकडेही कधाही गेला नव्हता. आई बाबा त्याला जबरदस्तीने फिरायला न्यायचे. रोहीत च्या जडणघडणीवर त्याच्या आईबाबाचे बारीक लक्ष होते.तो त्याच्याकडेही तो कधी ओपन झाला नाही.त्याच्यात बदल होईल या आशेवर ते वेगवेगळे प्रयोग करीत असायचे.
असा हा रोहीत सर्वाना सोडून पुढे निघुन गेला. त्याच्या आईचे दुख: कघीही कमी होणारे नाही. त्याचे शिक्षण जर पुर्ण झाले असते तर एखादे वेळी त्याच्यात बदल होउन तो सुधारला झाला असता असे त्याच्या आई बाबाना आता वाटत आहे.त्याने स्वत:हुन सर्व विचारानिशी निर्णय घेऊन आपले आयुष्य संपविले आहे.मनाचा कमकुवतपणा त्याला कोणता निर्णय घेण्यास भाग पाडले व तो कोठे निघुन गेला. हा टोकाचा निर्णय कसा काय घेतला व घेण्यास प्रवृत झाला हा एक प्रश्न राहिला आहे.त्याला काय मोठे दुख: होते ते काय कोणालाच कळले नाही. असाला निर्णय घेण्यास त्याने मन त्याचे कसे काय खंबीर केले असेल याचे कल्पना करता येत नाही. सर्वाना गाफिल ठेवून हा अनपेक्षीत निर्णय त्याने घेतला आहे. असे करेल याची कोणालाच कल्पना नव्ह्ती.त्यानी सर्वाना फसवले आहे. एकवीस वर्षाच्या रोहितने आपले आयुष्य त्याला जगण्यासाठीचा पर्याय न मिळाल्याने व न मिळविल्याने संपविले आहे. त्याच्या आत्मास शांती मिळो.
No comments:
Post a Comment