कोर्टाने मुबंईतील दोन महिला डाँक्टराना समाजविघातक प्रवृत्तीं स्त्रीगर्भाची हत्या रोखण्यासाठी केलेल्या या कायद्यांप्रमाणे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही 'गुन्हेगार' स्त्रिया आहेत, ही समाजाच्या द्दष्टीने संतापाची बाब आहे. पैशासाठी ही उच्च शिक्षित मडंळी कोणत्या थराला जातील याबद्दल कोणीच सांगु शकत नाही.डाँक़्टरी पेशाला ही मडंळी काळिमा आहेत. स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत हीन आणि अमानुष गुन्हा आहे, ही भावना समाजात रुजवण्यात सरकार आणि नागरी समाजाला अपयश आले आहे. कायदा राबवणारी यंत्रणा ही याच समाजातून आलेली असल्यामुळे, गुन्हे नोंदवण्याचे आणि गुन्हेगारांना झटपट व कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
गर्भात काही जेनेटिक विकृती वा जन्मजात शारीरिक दोष नाहीत ना, हे शोधणे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुकर केले. मात्र याचा वापर गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे जाणून घेण्यासाठी करण्यात आला आणि मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जाऊ लागला. गर्भावस्थेतच मुलींचे खून पाडण्यास तयार होणारे हे उच्चशिक्षित पालक व डॉक्टरच आहेत हेच आपले र्दुभाग्य आहे. केवळ पैशांसाठी त्यांनी घेतलेल्या या हत्येच्या सुपाऱ्याच होत्या. या सुपा-या मुलगी नको असलेल्या आईबापाकडून दिल्या जातात म्हणून दोघांच्याही गुन्ह्याचे स्वरूप सौम्य होत नाही. यामुळे देशातील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणात कमालीची विकृती निर्माण झाली आहे.
गर्भातच निवडीचा अधिकार बजावून, या भवितव्यापासून मुलींना वाचवले जात आहे, असे म्हणणा-या विकृत शहाण्यांची संख्या कमी नाही. परंतु अशा व्यक्ती केवळ गर्भावस्थेच मारल्या जाणाऱ्या लक्षावधी मुलींच्याच गुन्हेगार नाहीत, तर अवघ्या मानवी जीवसृष्टीच्याही आहेत. गर्भलिंग निदान करून स्त्रीगर्भाच्या हत्येचा मार्ग डॉक्टरमंडळी मोकळा करीत असतात. समाजद्रोही डॉक्टर आणि आपल्याच मुलीचा गर्भातच जीव घेणारे शिक्षित व समृद्ध पालक समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवायला मोकळे असतात. कायदा कठोर करूनही शेकडो कोटींच्या या उद्योगात मंदीची चिन्हे नाहीत, याचे कारण स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत हीन आणि अमानुष गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment