सर्पांचा मित्र म्हणजे शेतकरयाचा मित्र व पर्यावरणाचा रक्षण करणारा ठरला आहे. समाजात सापाबद्दल आजही समज-गैरसमज बरेच आहेत. साप डूख धरून राहतो, माग काढत येतो या पसरविलेल्या बातम्यांमुळे गावांतून व शहरातून सापाना नेहमीच मारले जाते. सर्पमित्रांमघले वन्यजीव संपत्तीवर भरभरून प्रेम करणारे सुनील रानडे वयाच्या अठरा-वीस वर्षांपासून साप वाचवण्याच्या मोहिमेत दाखल झाले होते. पण साप वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या सर्पमित्राचा मृत्यू नागदंशामुळे व्हावा यासारखे दुदैर्व नाही.
फणाधारी, दहाचा आकडा असलेला नाग, कुकरच्या शिटीच्या आवाजाप्रमाणे फुत्कारणारा घोणस, गुलाबी जिभेचा मण्यार, कोणत्याही क्षणी हल्ला करेल असा त्रिकोणी डोक्याचं फुरसं... महाराष्ट्रातील हे चारही विषारी साप मुंबई, ठाण्याच्या गजबजलेल्या वस्तीत आढळतात. त्यांना पकडण्यासाठी अनेकदा सर्पमित्रांना बोलवावं लागतं.
सापाची माहीती क़ळल्यावर, त्याला मारतील किंवा जखमी करतील या भितीने ते तडक ठीकाणी पोहचून काम फत्ते करीत असत. ऐवढी त्याना सापांबद्दल काळजी होती.सापांवर उपचार व देखभाल करायचे.
हजारो सापांची सुटका केल्यानंतर रानडेही सापांना सरावले होते. त्यामुळे मुंबईतल्या कोणत्याही ठिकाणी मिळालेला जखमी साप सुनीलकडे येत असे. सापाला सुनीलच्या हवाली केल्यावर सर्पमित्रही निर्धास्तपणे घरी जात.
सापांसाठी पार्क किंवा उपचार केंद तसेच सर्पमित्र संघटना उभारण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते.
या प्राणीमित्रांत काही गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींचा सुळसुळाट असल्याचा संशय आल्याने वनखात्याच्या आय कार्ड दिले आहेत. सर्पमित्रांनी पकडलेले साप जर त्यांच्या घरी सापडले अन् कोणी त्या बाबत गुन्हा दाखल केला तर, तो सर्पमित्र वन्यजीव कायदा १९७२ नुसार गुन्ह्यास पात्र ठरतो. त्याला शिक्षाही होते. आयकार्डचं कवचं या सर्पमित्रांकडे असेल तर त्यांना या गुन्ह्यातून अभय मिळेल.
सापांची काळजी घेताना अनेकदा दंश होतात, पण त्यामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण अत्यल्प तरीही वन खात्याने या सर्पमित्रांचा विमा उतरविला पाहिजे. सर्पमित्रही सामाजिक जबाबदारी म्हणूनच हे काम करत असल्याने त्यांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment