Monday, November 23, 2009

'गोली' एक वर्षाची.

'हँपी बर्थ डे टू गोली' तिच्या वाढदिवसाला आता काही दिवस उरले आहेत. कोण ही गोली? मुबंईवर हल्ला करणारे अतिरेकी कसाब आणि त्याचा साथीदार कामा हाँस्पिट्लमघ्ये शिरले असताना या गोडंस मुलीचा जन्म झाला. बदुंकीच्या गोळ्याच्या वर्षावात तिचा जन्म म्हणुन चव्हाण दाम्पत्याने खरोखरंच या मुलीचे नांव 'गोली'ठेवले. ही गोड मुलगी सर्वाची लाडकी आहे.
२६ नोव्हेबंरच्या रात्रीचा थरार आजही चव्हाण दाम्पत्याच्या डोळ्यादेखत उभा राहतो. २६ नोव्हेबंरच्या रात्री आठ वाजंता विजुला चव्हाण याना वेदना होऊ लागल्या नतंर त्याना कामा हाँस्पिट्लमघ्ये दाखल केले गेले. वेदना वाढल्यामुळे पत्नीला लेबर वाँर्ड्मघ्ये नेण्यात आले. डाँक्टरानी सांगितलेले औषध आणण्य़ास बाहेर पड्ले तेव्हा लोक सैरावैरा धावत होते.काय चालले आहे. याची चव्हाणाना कल्पना नव्हती. कामा हाँस्पिटलमघ्ये अतिरेकी शिरले आहेत याची कल्पना तोपर्यत हाँस्पिटलच्या कर्मचा-याना आली होती. पण रुग्णांच्या नातेवाईकांना काहीच माहीत नव्ह्ते. तिकडे पत्नीच्या वेदन वाढल्या होत्या. त्याच वेळेला डिलीव्हरी रुमच्या खिडकी बाहेर गोळीबार सुरु झाला होता. सर्व रुग्ण खाटांखाली लपले होते. त्याच धावपळीत या मुलीचा जन्म झाला. अतिरेक्याच्या गोळीच्या वर्षावात आपण सर्व मारले जाऊ नयेत, पण मृत्युची वाट पाहण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी काही तरी केले पाहीजे यासाठी सर्वाची धावपळ सुरु होती. वाँडमघ्ये अतिरेकी शिरु नयेत म्हणुन लोखंडाच्या वस्तु आडोसे वाँडच्या दारात लावून शातंता होण्याची वाट पाहत होते. अतिरेकी गेल्याचे कळल्यानतंर घाबरत घाबरत बाहेर आले. लपुन बाहेर पडलेले चव्हाण याना मुलगी झाल्याचे कळल्यानतंर जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. अतिरेक्याच्या हल्ल्यातून सर्व मडंळी सुखरुप असुन मुलीचा जन्मही व्यवस्थित झाला याचा हाँस्पिटलमघ्यले सर्व रुग्ण व कर्मचा-याना मोठा आंनद झाला. या मोठ्या सकंटातून सुखुरुप बाहेर पड्लेल्याच्या त्याच्या जीवनातला हा सर्वात मोठा आनंद ठरला होता. तिचा हा पहीला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
ह्या हल्ल्यात काही शहीद झाले तर काही जन्माला आले. कोठे दु:ख तर कोठे सुख दिसते. पण सामान्य जनताच याच भरडली जाते.

No comments: