पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जगभर पसरलेल्या लाखो अनिवासी भारतीय मंडळींना मायदेशी परतण्याचे आवाहन ह्ल्लीच केले आहे. शिवाय मायदेशात परतल्याचे असंख्य लाभ एनआरआयना मिळतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्या देशाचा विकास हा बड्या देशांच्या तुलनेत थोड्या धीम्या गतीने सुरु आहे. देशात उर्जा, व्यापार, पर्यावरण आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील विकास प्रक्रियेला चालना देण्याची गरज आहे. विविध क्षेत्रात भारतीय बाजी मारताना दिसत आहेत.आपल्या देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्व जनतेबरोबर परदेशात राहणा-या मडंळीचा अनुभव नक्कीच उपयुत्त्क ठरु शकेल. एवढी वर्षे अन्य जिथे राहिलात तिथे आपल्या बुद्धी आणि कौशल्याचा वापर केलात, आता या ताकदीचा वापर मायदेशाच्या विकासासाठी करण्याची गरज आहे. यासाठी आपला निर्णय अगदी योग्यच ठरले अशी अनुकुल परीस्थीती निर्माण करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी देत आहेत.
देश विकासाला हातभार लावण्याची इच्छा असणाऱ्या अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना एकत्र आणण्याची गरज आहे.भारताने गेल्या काही वर्षांत आथिर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली असून त्यात अनिवासी भारतीय उद्योजकांनीही हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले आहे. दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्थेने साधलेली प्रगती व अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग पाहता येथील एनआरआय उद्योजकांनी त्यात सहभागी व्हावे अशी विनंती त्यानी केली आहे. अनिवासी भारतीय आणि भारतीय मूळ असणारे परदेशी नागरिक यांनी भारतात नवनवीन उद्योग काढावेत. अनेक अनिवासी भारतीय, नॉन रेसिडेन्ट इंडियन्स यंदा प्रकाशझोतात आले, त्यांनी भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरलंच, पण निवासी देशाचीही मान उंचावली.
हे अनिवासी भारतीय जर परत मायदेशात आले तर भारत जगात महासत्ता बनु शकते याची जगातील विकसित देशाना कल्पना आहे. पण आपले भारतीय भारतात येण्यास तयार दिसत नाहीत.परदेशातील स्वच्छ वातावरणात राहणारे अनिवासी भारतीय भारतातील अवाढव्य लोकसंख्या,गर्दी,वाहतुक वअस्वच्छते बद्द्ल नाके मुरडत आहेत. सरकारी कामात पारर्दशकता नसल्याने ते भारतात येऊन उध्योग धंदे सुरु करण्याचा विचार करण्याचे धाडस करीत नाहीत. याना आपले सरकार मायदेशात परतण्याचे आवाहन करीत आहे पण या त्यांच्या अडचणींवर काही तोडगा सरकार काढु शकेल का? इथले कायदे कडक आहेत,भ्र्ष्टाचार,संथ कार्य पध्दती मुळे त्याना प्रस्थापित होण्यास खुप मोठा अवधी लागेल या कारणासाठी ही मडंळी भारतात येण्यास तयार नाहीत असे वाचण्यात आले आहे. आपले सरकार याना काही सवलती देण्यास तयार असल्यास त्याला जाहीर प्रसिध्दी दिल्यास भारतात येऊन प्रयत्न करण्याचा विचार करतील.हे अनिवासी भारतीय मायदेशात परतले तर आपण बलवान होउन जगावर राज्य करु.
No comments:
Post a Comment