Monday, December 7, 2009

मुस्लिमाचा सहभाग उल्लेखनिय.

ठाण्यात २६/११ ला परिवर्तन प्रतिष्टान संख्येने 'भारतीयांसाठी देतात रक्त,तेच खरे देशभक्त' या उक्तीचा प्रत्यय या उपक्रमातुन दाखवुन दिला.देशात खुप ठीकाणी रक्तदान शिबीरे भरवली गेली पण या शिबीरात रक्तदान करणा-या १४८ पैकी १०४ जण मुस्लिम समाजाचे होते हे विशेष! या कार्यक्रमाचा वृतांत पाकिस्तान दुतावासापर्यत पोहचला पाहिजे.समस्त भारतीय एक आहोत हे त्याना कळले तरच त्यांचे धार्मिक भावना भडकवुन आपल्याएकात्मतेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न बंद होतील.
देशात मुस्लिम लोकसंख्या मोठया प्रमाणात असुन स्वातंत्र्य मिळुन एवढी वर्षे होउनही आतापर्यत एकहीमुस्लिम पंतप्रधान कसा मिळाला नाही.देशाच्या राजकारणात मुस्लिमांचे प्रमाण अत्यल्प असल्याने तेवाढवण्याचे प्रयत्न मुस्लिम समाजने केले तरच समाजचे अनेक प्रश्न सुट्ण्यास मदत होईल.राजकारणातला मुस्लिमांचा सहभाग वाढल्यास त्यांच्या नेत्यांच्या नेतृव्तांवर ते पहीला पात्र मुस्लिम पतंप्रधान देउ शकतातअसे राहुल गांधी चे म्हणणे आहे.
देशात दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांचा देशातील इस्लामिक संघटना जाहीर निषेध व विरोध करताना दिसत नाहीत असा भारतीय जनतेचा आरोप आहे.त्यामुळे हे भीषण हल्ले करण्याचे घाडसह्या मुस्लिम दहशतवादी करु शकतात.देशातील सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येउन दहशतवादी कारवाया उधळुन लावण्यात गुप्तचर यत्रंणेला सहाय्य केल्यास दहशतवादावर अंकुश बसेल व देशात शातंता प्रस्थापित होईल.
दहशतवादाच्या विरोधात असेच मुस्लिमानी समाजात प्रबोधन करुन समाजाने ऐक्य दाखविणे गरजेचे आहे.
खरे युध्द हे दहशतवादाशी नसून आपल्या धर्माध व जातीय वृतीशी आहे.जन बदलावे असे वाटत असेलतर प्रथम आपण बदलेले पाहिजे.'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' तरच अतंर्गत कलह कमी होतील.

1 comment:

शब्द सितारे... said...

DHARM YA SHABDACHAA WAPAR HINDU KIWAN MUSLIM YAS JODU NAKA,KARAN DHARM YA SHABDAACHE ARTHCH WEGLLE AHE