Thursday, December 10, 2009

'ने मजसी ने'

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।

मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ ।

सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें ।

परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन ।

त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी ।

मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उध्दरणी ।

मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला ।

सागरा , प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ।

ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती ।

दशदिशा तमोमय होती गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें ।

कीं तिने सुगंधा घ्यावें जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा ।

हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता ।

रे तो बाल गुलाबही आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला ।

सागरा , प्राण तळमळला नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।

मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।

आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा ।

वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थं हें आता ।

रे बहु जिवलग गमतें चित्ता । रे तुज सरित्पते । जी सरिता ।

रे तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।

सागरा , प्राण तळमळला या फेन-मिषें हससि निर्दया कैसा ।

का वचन भंगिसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।

भिउनि का आंग्लभूमीतें मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ।

मज विवासनातें देशी तरि आंग्लभूमी-भयभीता ।

रे अबला न माझिही माता । रे कथिल हें अगस्तिस आता । रे जो आचमनी एक पळीं तुज प्याला ।

सागरा , प्राण तळमळला



स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद किनाऱ्यावर लिहिलेल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यावर एक कणखर व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येतं.


मातृभुमीच्या ओढीने त्याचा जीव तळमळत असताना या कवितेचा जन्म झाला.त्यानी त्याच्या अंर्तमनातील वादळ या काव्यात व्यक्त केला होता.
आपल्या देशात ' एकाच परिवाराने ' बलिदान केल्याचे सतत बोलले जाते , सावरकर आणि चापेकर परिवाराने बलिदान केले नाही काय ? पण नाही , त्यांच्या या आहुतीला आपण खरंच सन्मान केलाय का ? प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारुन पाहायला हवा.

या निमित्तने स्वा.सावरकरांच्या साहित्याशी निगडित संस्था व सेवा केंद्रे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत.पण त्यांच्या विचारांचे अनुकरण होताना दिसत नाही यांची खंत वाटते.

थोर स्वातंत्र्यवीर सावरकारांना त्रिवार अभिवादन.

1 comment:

शब्द सितारे... said...

saagra pran tallmalla.. veer savrkranchya aatwani ...khup uttam

pleae remove word verification on coment.