
मी राहतो तेथे माझ्या समोर एक प्लाँट पडून आहे.बाजुला सिडकोच्या वसाहातील इमारती आहेत.त्या प्लाँटवर मुल खेळ्त असतात.गुरे बसलेली असतात.तेथे साफसपाई नाही.
काही दिवस मी बाहेरगांवी गेलो होतो.आल्यानतंर बाहेर पाहिले तर त्या प्लाँटच्या दोन्ही बाजुला दोन बाधंकामे सुरु होती.सुरुवातीला बरे वाटले चला घाण तरी जाईल.चौकशी नतंर कळले त्या प्लाँटवर दोन्ही दिशेला दोन मंदिरे बाधंली जात आहेत.तेथे राहत असलेली दोन वेगवेगळी मडंळे ही मंदिरे बाधंत आहेत.एक गणपतीचे तर एक हनुमानाचे.त्या दोन्ही मडंळातील स्पर्धेमुळे मुलांनी केलेला विरोध हाणुन पाडला गेला.सुरुवातीला छोटीछोटी मंदिरे बाधंण्यात आली.ह्या मंदिरांवर सिडकोनी काहीच कारवाई केली नाही.त्याबरोबर मडंळानी मदिरांच्या कामाला वेग आणला.एका मडंळानी सभामडंप बाधंला तर लगेच दुस-यानी तसाच बाधंला.मग काय स्पर्धा सुरु झाली.मोठ्या उत्सवात मंदिरातून देव बसले.तेथेही या मडंळातून स्पर्धा होतीच.मडंळे,सोसायटी,संस्था मघ्ये वादावादी शिवाय कारभार होत नाही.
मराठ्याना एकत्र न येण्याचा हा शाप खुपच जुना आहे.
दोन्हीही मडंळे मराठी पण एकत्र येऊन एकच मोठे मंदिर बाधंले नाही.वादावादी करीत दोन मंदिरे बांधली आणि दुस-या समाजाला ह्या उदाहरणांने आमच्यात ऐकी नाही हे दाखवून दिले .प्रत्येक गावांत भाडंणे तर प्रत्येक गावांत चार चार पक्ष आहेत.राजकारणामुळे ही वादावादी खुपच वाढत चाललेली आहे.शालेय जीवनापासूनच ही कीड रुजली जाते.पुढे पुढे ती फोफवते.मग रक्तात भिणली जाते.
हा शाप आताचा नाही.मागचा इतिहास आणि आता आपल्यात जे घडत आहे ते सर्वाना माहीत आहे. ह्या शापातून आपण केव्हा मुक्त होणार?की असेच आपापसात वाद घालुन आपली शक्ती वाया घालविणार आहोत.
नव वर्षाच्या मुहुर्तावर आपण सर्वानी मिळुन एकत्र येवून ऐकामेकास सहकार्य करण्याची शपथ घेऊन मराठ्याची शक्ती मजबुत करुया.तरच आपला व आपल्या पुढील पीढीचा उत्कर्ष होईल.
1 comment:
happy new year 2010
http://yajaganyavar.blogspot.com/
Post a Comment