नूतन वर्षाचे आनंदाने स्वागत करण्याच्या जल्लोषाच्या, नाचगाण्यांच्या, आतषबाजीचा केवढा मोठा मायाबाजार हल्लीच्या काळात बघायला मिळतो. पण या उत्सवातून संस्कृती कुठेतरी हरवून गेली आहे असे जाणवते. धनिकांचे, उच्चभ्रूंचे स्वागत समारंभ तर काय वर्णन करावे? पण दीर्घकाळ वंचिताचे, उपेक्षिताचे, समाजाच्या अगदी तळाच्या स्तरावर हलाखीचे जीवन जगणाऱ्यांना १ तारखेला येणाऱ्या नव्या वर्षाचे काय कौतुक असणार? उलट त्यातल्या अनेकांची भावना कालचा दिवस बरा होता असेच म्हणण्याची असणार. आपल्या देशात विविध धर्माचे लोक नांदत आहेत. या प्रत्येक धर्माचे, तो पाळणाऱ्या लोकांचे नववर्ष वेगवेगळ्या दिवशी, महिन्यात किंवा तारखेला येतं. सर्वधर्म समभावाच्या सामाजिक नात्याने आपणही त्यांना त्यांच्या नववर्षाच्या शुभेच्छा देत असतो. पण १ जानेवारीला ही सर्वच बंधने सैल झालेली असतात आणि म्हणूनच या उत्सवात एक स्वाभाविक मोकळेपणा असतो.
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांनीच संकल्प करायला हवा, तो दुस-यांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलविण्याचा. स्वत:पुरतंच पाहण्याची वृत्ती सोडण्याचा आणि अधिक व्यापक अवकाशाची ओळख करून घेण्याचा.
डिसेंबर महिना वर्षअखेरची वाट चालू लागतो, तेव्हा संपणाऱ्या वर्षातील आपल्या वाट्याला आलेली सुख-दु:खे पुन्हा एकदा भेटीला येतात आणि नंतर स्मृतीकोशात नोंद होण्यासाठी बहुदा कायमचीच निघून जातात.
या भूतलावर आपल्याला मिळालेल्या कालावधीतून एक वर्षाची वजाबाकी झालेली असते. पण १ जानेवारीपासून येणाऱ्या नववर्षासाठी काही नवीन मिळवण्याचे, नवे घडवण्याचे आणि नव्या संकल्पांचेही मनामध्ये बीजारोपण होत असते. सरत्या वर्षाकडे वळून बघताना हुरहूर लागलेली असते; पण नव्या वर्षाकडे बघताना मात्र बहुतेकजण आशावादी असतात. मनातल्या मनात आपण कितीवेळा चुकीचे वागलो आणि कितीवेळा चुकीचे बोललो, याचाही हिशेब मांडला जातो.
खरंच आपण दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे मळे फुलवण्यासाठी एकतरी पाऊल टाकणार आहोत का? दुसऱ्याला आनंदी करण्याचा विचार मनात येणे हेसुद्धा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या बाराच्या ठोक्याचे वेगळेपणच!
सकंल्प केलेच पाहिजेत व ते सिद्धीस नेण्याचे प्रयोजनही केले पाहिजे. सक़ंल्प हे करायचेच असतात.पण वर्षाभरात त्या सकंल्पाना विसरायाचे नसतात. जीवनात सक़ंल्पाना खुप मोठे महत्व आहे.सक़ंल्प नसले तर जोवनात गोडी नाही.
सकंल्प केलेच पाहिजेत व ते सिद्धीस नेण्याचे प्रयोजनही केले पाहिजे. सक़ंल्प हे करायचेच असतात.पण वर्षाभरात त्या सकंल्पाना विसरायाचे नसतात. जीवनात सक़ंल्पाना खुप मोठे महत्व आहे.सक़ंल्प नसले तर जोवनात गोडी नाही.
1 comment:
khup chaan
happy new year 2010(ad)
please remve your word verfication on coment
Post a Comment