Thursday, December 24, 2009

तिच्या अपेक्षा.


तिला घरात मुलासोबत बरोबरीने वागवलं जातं.तिची शिक्षणातली प्रगती,तिचा वाढणारा आत्मविश्वास,ती घेत असलेली झेप पाहून तिच्याबद्दल मनापासून कौतुक दाटुन येतं आणि आपण आपल्या मुलीला घडवलंय,या बद्दल स्वत:चाच अभिमान वाटायला लागतो. आतापर्यतच्या अनुभवाच्या प्रवासाने निस्पृह आणि स्वातंत्र्य बाण्याचा वृत्तीने तिच्यात छान मुळ घ्ररलं असतं. पण वय वाढत असतं.मग ,वेळ येते ती तिच्या आयुष्याच्या दुस-या भागाची.तिने स्वत: कोणाला शोधलं नसल्याने आईबाबा खुप प्रयत्नाने तिच्यासाठी सुयोग्य 'स्थळ'आणतात आणि शक्यता-अशक्यतांचा सारासार विचार करत ती स्वत:चं प्रक्टिकल आयुष्य पुन्हा एकदा नव्याने प्लँन करते. हे तिच्यासाठी कठीण असतं.पण,तरीही तिच्या स्वातंत्र्य वृत्ती तिला नव्या तडजोडी स्वीकारते.पण त्या तडजोडी स्विकारताना, स्वत:च्या भविष्याचे नवे आखाडे बाधंते.हे सगळं ठरत असतानाच,नव्या जबाबदा-या समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतानाच तिला अचानक कुठेतरी जाणीव करून दिली जाते की,'तू कितीही स्वतंत्र्य मनोवृतीची असलीस तरी तू मुलगी आहेस..होणारी सून आहेस.आता यापुढे तु जे निर्णय घेशील ते त्या घराला चालतील का, त्या घरच्यांना आवडतील का? त्या घराच्या मर्यादेत राहून ज काय ठरवायचं हे ठरव.आतापर्यत तू मनासारखं जगलीस ना. ती मडंळी शिकलेली आहेत.यापुढेही ती तुला मनासारखं वागायला देतील.तू लग्नातंर हवं ते करं...फक्त नवरा,सासुसासरे,त्यांचा मान-मरातब,त्यांच्या सवयी,त्याच्या मर्यादा,आणि अपेक्षा,त्यांच्या अटी वगैरे ..एवढ्याच गोष्टीचं फ्क्त भान ठेवायला हवं.बाकी तुला जे करायचंय त्यासाठी तू मोकळी आहेस 'हे फक्त 'फक्तचं असतं? खरचं..?



सुशिक्षित, स्वतंत्र्य विचारांच्या आणि एका ठराविक वयानंतर अरेंज मॅरेजचा पर्याय स्वीकारायची इच्छा असणाऱ्या बहुतेक उच्च मध्यमवगीर्य मुली याच कात्रीत सापडलेल्या असतात. आयुष्यात तडजोड करावीच लागते. मान्य! पण तडजोड म्हणजे स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य गमवणं? आणि या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल जर मोकळेपणाने बोलायचा प्रयत्न केला, तर आतापर्यंत हुशार, मोकळ्या स्वभावाची वाटणारी ती मुलगी अचानक रिबेलिअस, आगाऊ, अतिशहाणी ठरायला लागते. का..? का तर ती मुलगी आहे, हीच प्रत्येक तडजोडीची बॉटमलाइन असते.



खरं सांगायचं तर, करिअर आणि घर याचा किंवा आपल्या संसाराचा समतोल कसा राखायचा, ही जाणीव तर तिला नक्कीच असते. पण फक्त ती मुलगी आता सून होणार म्हणून तिच्यावर गरज नसणाऱ्या जबाबदाऱ्या लादणं, तिच्या विचारांच्या तागडीत स्वत:ची मापं ठेवणं कितपत योग्य आहे..? हा फक्त तिचा, तिच्या नवऱ्याचा किंवा तिच्या/त्याच्या घरच्यांचा प्रश्न नाही. तर बदलत्या काळाचा, तो काळ समजून घ्यायच्या क्षमतेचा आणि तिचं अस्तित्व मान्य करण्याचा प्रश्न आहे.



याशिवाय आणखी एका थॉट प्रोसेसकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. विसाव्या- बाविसाव्या वषीर् एखाद्या मुलीचं लग्न होतं, तेव्हा नवीन घरात अडजस्टमेण्ट करणं तिला तसं सोपं असतं. तिच्या समांतर आयुष्याची सुरुवात नुकती कुठे होत असते. त्यामुळे संसाराची घडी हातात घेऊन मग कालांतराने करिअरची चाकं फिरवणं जास्त सहज होतं. पण जेव्हा ती पंचविशीच्या किंवा तिशीच्या घरात पोहोचते, तेव्हा मात्र हे थोडं कठीण असतं. आपल्या आयुष्यात ती रुळलेली असते, आपलं करिअर तिने सेट केलेलं असतं. काळाबरोबर आपल्या विचारांना अनुभवाची धार आलेली असते. तिचं व्यक्तिमत्व पूर्ण घडलेलं असतं, आपलं अस्तित्व तिने सिद्ध केलेलं असतं. मग, अशावेळी जेव्हा लग्नसंस्थेला स्वीकारताना ती जेव्हा स्वत:च्या काही आशा-अपेक्षा ठेवते, तेव्हा त्या समजून घेणं ही इतरांची जबाबदारी असायला हवी. वीस-बावीस वर्षांच्या मुलीकडून केली जावी इतकी सर्वसामान्य अपेक्षा तिच्याकडून करणं साफ चुकीचं आहे. तिला स्वत:च्या भविष्याची सुरक्षिततेची जाणीव झालेली असते. त्यामुळेच स्वप्नाळू भविष्यापेक्षा वास्तववादाची चाड तिला अधिक असते. खरं पहाता हे तिच्या आणि त्याच्या भविष्याच्या दृष्टीने जास्त डेफिनेट होऊ शकेल.



तिने इतरांना समजून घ्यायला हवं, तिने तडजोड करावी अशा अपेक्षा तिच्याकडून केल्या जातात, तेव्हा तिच्याही आशाअपेक्षा असू शकतात, हे इतर सर्वांनीच स्वीकारायला हवं!




प्रत्येकाने तिच्या अपेक्षांबद्द्ल विचार केला पाहिजे व तिच्या व्य्क्तीस्वातंत्र्यावर गदा न आणता तिला आपण तिच्या मताने निर्णय घेण्यास मदत केल्यास ती आनंदी होउन नक्कीच सुखी होईल.माहेरच्या किंवा सासरच्या कुटुबांने आपली मते तिच्यावर लादू नयेत.तिनेही लग्नाच्या अगोदर आपल्या अपेक्षा माडंल्या तर दोन्ही कुटुबांला विचार करण्यास त्याचा फायदा होईल.





No comments: