काल माझ्या मित्रासह एलिफंटा गुहा (घारापुरी लेणी) पाहण्यास गेलो होतो.लाँचचा प्रवासात गप्पागोष्टी करीत करीत आम्ही त्या बेटावर पोहचलो.जगातील प्रसिध्द लेणी पाहिली. लहान मुलांना घेऊन सपुर्ण बेटावर फिरलो. गावात फेरफ़टका मारला.
सध्यांकाळी परतीचा प्रवास लाँचने सुरु केला. सुर्यास्त होताना गार वा-यातला प्रवास मनाला सुखद वाटत होता. आमचा ग्रुप लाँचच्या डेकवर बसून खाऊ खात गप्पागोष्टी करीत मजामस्ती करत होतो. एक पक्षी आमच्या लाँचच्या मागे उड्त आम्हाला सोबत देत होतो. पक्षी सफेद सुदंर होता.पण त्याचे लक्ष आमच्यावर होते. पक्षी लाँचच्या वेगात उडत होता. त्याची उडण्याची स्टँइलही सुंदर होती.त्यामुळे सर्वाचे लक्ष वेधुन घेत होता. आमच्यातल्या एकाने त्याच्यासाठी पावाचा तुकडा हवेत उडविला. त्या पक्ष्याने तो हवेतच झेलला.आम्हाला मजा वाटली.मग सर्व मडंळी पुढे सरसावली. आमच्यातल्या त्या पक्ष्यांसाठी मुलांने खाऊ टाकण्यास सुरुवात केली. तेवढयात त्याच्या सारखेच आणखी काही पक्षी आमच्या मागे उडताना दिसु लागले. आता आम्ही खाऊ फेकत होतो ती मडंळी झेलत होती.पण एकही कण खाली पाण्यात पडु देत नव्ह्ते. जसे काही क्रिकेट कोच खेळाडुना कँच प्रक्टीस देत असल्या सारखे वाटत होते. ते पक्षी मात्र खुपच हुशार खाऊचा एकही तुकडा फुक़ट जात नव्हता. भारतीय संघातल्या खेळांडुनी या पक्ष्याकडुन शिकले पाहीजे. त्या पक्षांची संख्या खुपच वाढली होती. खाऊ टाकणे सुरु होते. त्या पक्ष्यात खाऊ झेलण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. आता एका एका कणासाठी पक्ष्यामघ्ये हानामारी सुरु झाली. ते एकामेकाला मारु लागले.
अश्या कृत्यामुळे हे पक्षी पक्के राजकारणी वाटले,एका खुर्चीसाठ (खाउसाठी) भाडंणारे.लहान मुलाना ही द्दशे पाहुन आनंद होत होता ती मडंळी मजा करीत होती. पण पक्षी खाऊ पकडण्यासाठी घरपड होते. आम्ही खाऊ टाकणे बंद केल्याने ते पक्षी थोडा वेळ उडत राहीले. नतंर दमल्यामुळे ते पाण्यावर तरंगत राहीले. आणि मग परत मागे फिरले. थोड्या वेळात दिसेनासे झाले.या पक्ष्यानी आम्हाला आमच्या प्रवासात खुप वेळ साथ दिली. समुद्रावर राज्य करणा-या ह्या सुदंर पक्ष्याना आकाशात स्वच्छदी उडताना पाहत राहवेसे वाटते. काही वेळेसाठी आपलेही मन असेच आकाशात उडत राहते.
No comments:
Post a Comment