जागतिक हवामान परिषदेच्या कोपनहेग मधल्या या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी काही शिल्प जाणीवपूर्वक दिसतील आणि लक्षही वेधून घेतील, अशा पध्द्तीने प्रदर्शित केली गेली आहेत.आपल्याकडच्या काही वृत्तपत्रांनी या शिल्पांना आर्वजून प्रसिध्दीही दिली आहे.
टेलिव्हिजनवर परिषदेच्या बातम्या पाहताना ही शिल्पे उठुन दिसत आहेत. या शिल्पांमघ्ये अगदी लहान मुलांची विविध भावम्रुदा असलेली शिल्पे आहेत तशीच एका हडकुळ्या माणसाच्या खांद्दावर बसलेल्या एका जख्खड आणि वजनदार म्हातारीचे शिल्पही जास्त वेळा दिसते. सर्वसाधारणपणे शिल्प माडंली जातात ती जमिनीवर,उंचीवर,हिरवळीवर,चौथ-यावर.कोपनहेगमधल्या या शिल्पासाठी मात्र खास जागा शोधली आहे.ही जागा आहे पाण्याखालची. पाण्यात शिल्पे ठेवण्यामागची कल्पना अफलातून होती.शिल्पाची निर्मिती उत्तम असून चालत नाही तर शिल्पांची माडंणीही प्रभावी असावी लागते.तरच शिल्पांमागचा अर्थ लोकांपर्यत पोहचु शकतो.माडंणी आर्कषक नसेल तर चागंली शिल्पेही दुर्लक्षित राहतात. आता या शिल्पांचा आणि कोपनहेगमघल्या त्या जागतिक परिशदेचा सबंध काय,असे कोणालाही वाटणे स्वाभविक आहे. पण ही शिल्पे परिषदेत माडंण्यानागचा हेतू मोठा आहे. लहान मुलांच्या शिल्पांच्या चेह-यांवरची निरागसता तसेच अनेक भावमुद्रा आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याची भीती पाण्यात बुडत असलेल्या त्या मुलांच्या शिल्पांमघ्ये जाणवत आहे. दुसरे शिल्पही अस्वस्थ करणारेच आहे.अत्यंत गर्भश्रीमंत आणि विकसित राष्टांचे प्रतिनिधीत्व शिल्पातली जख्खड आणि वजनदार म्हातारी करत होती तर ज्याच्या खांद्दावर ही म्हातारी बसलेली दिसली तो ह्डकुळा माणुस म्हणजे स्वत:चा विकास करण्याची क्षमता नसलेल्या राष्टांचे प्रतिक म्हणून शिल्पात आला होता. पर्यावरण वाचवयच्या निमित्ताने अविकसित देशांच्या प्रगतीलाच विकसित राष्टे खिळ घालणार हेच त्या म्हातारीच्या ओझ्याने अर्धमेला होउन पाण्यात बुडुन मरायची वेळ आलेल्या हडकुळ्या माणसांच्या शिल्पातुन प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका शिल्पकाराला असलेले विषयाचे आव्हान त्याने समर्थपणे पेलेले,हेच त्यातून सूचित होते. 
खरे तर विकसित देश प्रगतीच्या निमिताने निसर्गाचा समतोल बिधडविण्याचे काम करीत असुन त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वाला आणि पर्यायाने समस्त मानवाला धोका निर्माण झाला आहे. चित्र व शिल्पांची भाषा वैश्विक आहे. म्हणुनच ती महत्वाचीही आहे.कळते पण वळत नाही, अशी अवस्था झालेल्या माणसाला या जागतिक हवामान परिषदेच्या माध्यमातून किती शहाणपण सुचेल,हे कळायला मार्ग नाही; मात्र या शिल्पांमघुन व्यक्त होणारी भावना आणि भीती समस्त मानवाजातीला कळली तरी खुप झाले. 
 
1 comment:
ब्लॉग मस्त आहे
Post a Comment