Tuesday, January 5, 2010

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावर कोणत्याही वयात काही वेळा गुंता इतका वाढतो की, सगळं काही इथेच संपवावं असं वाटू लागतं. कमकुवत मनाचे लोक, थेट आत्महत्येचा मार्ग पत्करतात. बेरोजगारी, प्रेमभंग, कर्जबाजारी होणं, अपत्याचं दुखणं असह्य होणं, अशा अनेक समस्याने गाजंलेले असा निर्णयघेत आहेत.यामघ्ये आता विद्दार्थी अभ्यासाच्या बोज्यामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत.परीक्षेचा ताण सहन न होऊन आलेले नैराश्य, कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची खंत अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण असतो.त्यातही पौगंडावस्थेतील मुलांना शारिरीक बदलांबरोबर बाह्य जगातील ताणतणावांचा सामना करणे कठीण जाते. हा तणाव व्यक्त करणे शक्य न झाल्याने काही अंशी त्याची परिणती आत्महत्यांमध्ये होते. अगदी दोनच दिवसांपूर्वी, ४ तारखेला सातवीत शिकणारा सुशांत पाटील, पाचवीतली नेहा सावंत आणि मेडिकलची विद्यार्थिनी भजनप्रीत कौर या तिघांनी असंच आपलं जीवन संपवलं होतं. आज नाशिकमध्ये इंजीनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीनं आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.एखादी रोगाची साथ आल्या सारखी ह्या आत्महत्या होत आहेत. ही भविष्यातील धोक्याची गंभीर घंटाच आहे.प्रत्येक आत्महत्या हे एकप्रकारे समाजांतर्गत आत्मसंरक्षणाच्या यंत्रणांचे अपयशच असते. बदल हा या सृष्टीचा नियम आहे. पण या जीवन शैलीच्या बदलाशी सर्वाधिक जुळवून घेण्याची क्षमता विकसित झाल्यामुळेच मानवी समाज टिकून राहिलेला आहे.प्रचंड स्पर्धा, अभ्यासाचा वाढता बोजा आणि अभ्यासाबरोबरच इतर अॅक्टिव्हिटीजमध्येही नंबर वनपद मिळवण्याचा अट्टाहास मुलांच्या जीवावर उठलाय. पण, याला नक्की जबाबदार कोण? शिक्षणपद्धती की पालकांचं वाढलेलं प्रेशर?प्रत्येक वेळी पालक किंवा शिक्षकच प्रेशर देतात असं नाही. तर काही मुलं स्वत:लाच तणावात गुरफटून घेतात. अभ्यासाचाबरोबरच या मुलांवर एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्टिीजचंही मुलांवर प्रेशर असतं.

अपयश प्रत्येकाच्या वाट्याला येतं. त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही. 'अपशय स्वीकारा, ते पचवा आणि पुढे जा,' असा धडा पालक आणि शिक्षकांनी मुलांना दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे!आजची परिस्थिती पाहता मुलांना 'आत्महत्या' म्हणजे काय ते समजवुन सांगणे अत्यंत गरजेचे आहे.अपयश स्विकारायला शोकविले पाहिजे.आत्महत्येने प्रश्न सुटणार नाहीत, हे समजावलं की मुलं या वाटेने जाणार नाहीत. मुलांवर अभ्यासाचा किंवा इतर कोणत्याही बाबतीत दबाव न आणता, आपली मुलं आहेत तसं त्यांना पालकांनी स्वीकारायला हवं. काही झालं, की 'ही पिढीच अशी आहे,' असा दोष न देता मुलांशी खुलेपणाने आणि सकारात्मक रीतीने संवाद साधा.

टीनएजमध्ये मुलांमध्ये शारिरीक आणि मानसिक बदल होत असतात, त्यामुळे त्यांना सांभाळले तरच ही मुले आत्महत्येचा निर्णय घेणार नाहीत.पालकानी आपल्याकडुन पाल्यावर कोणताही दबाव पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

1 comment:

शब्द सितारे... said...

खूप छान वर्णनात्मक लेख......पुढे चालू...