
पतंग उडविणे ही काय मजा असते ते ज्यानी पतंग उडविल्या आहेत त्यानाच माहीत.दुस-याने सांगुन न कळणार नाही.वेगळीच मजा अनुभवता येते.
पतंगाला कनी बांधली की पतंग उडायला तयार. कनीचेही एकास एक, शून्य शून्य, एकास शून्य असे प्रकार असतात. पतंग आकाशात उडाला की त्याकडेच एकटक पाहात 'असे वाटते पतंग व्हावे...' म्हणत आकाशात उंच भरारी घ्यावीशी वाटायची...
तो पतंग आकाशात उडाला की त्याकडेच एकटक पाहायचो. 'असे वाटते पतंग व्हावे...' म्हणत आकाशात उंच भरारी घ्यावं असं वाटायचं. जानेवारीत आकाश गोधडीसारखं रंगीबेरंगी ठिगळं लावल्यासारखं दिसायचं. ही ठिगळं असायची पतंगांची. मग पेचाला सुरुवात होई. त्यातही ढिल देणं आणि घसीटणं असे पेच खेळण्याचे दोन प्रकार असत. पेच लागल्यावर खरी मजा येई. रोमहर्षक असायचे ते क्षण! पुढच्या क्षणी काय होईल याची हुरहुर निर्माण करायचे. मग कोणाचातरी पतंग कापला गेल्यावर ' ए गुल्ल!!!'च्या आवाजाने गल्ली दुमदुमून जायची. रस्त्यावर पोरं तो कापलेला पतंग पकडायला तयारच असायची.. सगळेजण पतंग कुठे पडणार हा अंदाज न बांधताच त्या पतंगापाठी धावत सुटायची. कधी कधी तो विजेच्या तारांमध्ये अडकायचा. मग पोरांचा हिरमोड होई. तर कधी तो पहिलं 'कोण घेणार' या ओढाओढीत फाटून जायचा. तेव्हा डोळ्यांतून पाणीच येई!
त्यावेळी मला नेहमी वाटायचं माणसाला पक्ष्यांप्रमाणे उडता येत नाही तो आध्ध्ी खिन्न झाला असावा आणि मग त्याने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कदाचित पतंगाचा शोध लावला असावा!
आज जवळपास ३५ वर्षं झाली असतील पतंग उडवून. पण त्यावेळचा तो भाबडेपणा अजूनही हवाहवासा वाटतो!त्यावेळी मित्रांसह केलेल्या मजा आजही आठवतात.वेळे मिळाला तर आताही पतंग उडविण्याचा प्रयत्न करतो. ज्यानी ज्यानी लहानपणी पतंग उडविले असतील त्यानी प्रत्येक वर्षी संक्रातीला पतंग उडविल्यास त्याला त्याचे लहानपण दिसेल.
पतंग उडवावा कसा......... - पतंगाचा आत्मा असतो कणी. पतंगाची दिशा कणीवर असते. ही कणी नीट बांधली पाहिजे.
- गाठीपासून दोन बोटं वर आणि एक बोट खाली अंतर ठेवून कणी बांधायची.
- मांजाची जखम होऊ नये म्हणून बोटाला बॅण्डेड लावलं जातं. पण मांजा जास्त खेचला तर पट्टीला काचूनही जखम होते. अशावेळी लगेच तिथे उपचार करावेत.
- पतंगांची खरेदी आधीच करावी. त्यामुळे कणी बांधून पतंग उडवण्यासाठी ते तयार मिळतील.
- काही ठिकाणी कणी बांधूनही दिली जाते. पण त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात.
- पतंग कापताना वरच्या बाजूचा पतंग कापला जातो. पण कधी तुमचा पतंग वर असेल, तर अशावेळी ढिल सोडणं शहाणपणाचं. - आपला पतंग कापलाच तर झरझर फिरकीला मांजा गुंडाळावा लागतो. हेही स्कीलचं काम आहे.
- पतंग उडवताना वाऱ्याची दिशा कळणं महत्त्वाचं. सकाळच्या वेळी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा असतो. दुपारपर्यंत हवा बदलते.
- कधीकधी पानही हलत नाही. अशावेळी पतंग उडवणं कर्मकठिण.
- पूवेर्कडून दक्षिणेकडचा वारा भन्नाट. अशावेळी पतंग फाटण्याचा धोका असतो. बऱ्याचवेळा पतंगाचं वजन उडवणाऱ्याला पेलता येत नाही.
- पेच लावण्याचा प्रकार सर्वार्ंनाच जमतो असं नाही. पेच लावता येत नसेल तर एकट्याने पतंग उडवावा.
- रात्री पांढऱ्या पतंगांवर दिवे सोडले जातात. एका पतंगावर नऊ-नऊ दिवे लावले जातात.
पतंगावर वेगवेगळे संदेश लिहुन उडविल्यास तो संदेश लोकांपर्यत पोहचतो.वेळेच्या अभावी आम्ही फक्त मकर संक्रतीलाच पतंग उडविणे जमते.
No comments:
Post a Comment