Wednesday, January 13, 2010

चीनवरचे परावलंब अयोग्य.

देशात स्थानिक उत्पादनांवर कर द्यावा लागतो, पण चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालांवर मात्र कर नाही. चीनच्या चलनाचे मूल्य निश्चित असते. भारतीय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर'चे उत्पादन क्षेत्राचे पद्धतशीर खच्चीकरण चीन करीत असून, चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीवर केंद सरकारने २५ टक्के 'अँन्टि डंपिंग ड्युटी' लागू करावी अशी मागणी खासगी क्षेत्रातून होत आहे.आपल्या देशातील वीजनिमिर्ती कंपन्या त्यांना लागणाऱ्या 'पॉवर प्लॅण्ट इक्विपमेंट'पैकी ८० टक्के सामग्री चीनमधून आयात करतात.चीनसारख्या देशावर इतके परावलंबन चांगले नाही.
दहशतवादी व घुसखोरी करणा-या पाकिस्तान या देशाबरोबर आपण संबध ठेवत नाही.तर मग चीन हा देशही घुसखोरी करीत असताना त्यांच्याशी आपण का संबध ठेवत आहोत?एकीकडे भारताबरोबरचे राजकीय वाद तापवीत न्यायचे आणि दुसरीकडे भारताने अवास्तव व्यापारी सवलती द्याव्यात असे चीनला वाटते.पण राजकीय आणि व्यापारी व्यवहार यात सुसंगती असल्याशिवाय दोनही पातळ्यांवर चांगले संबंध राहू शकत नाहीत, हे चीनला आता उमगू लागले आहे.चीन हा भारताशी व्यापारी व्यवहार करणारा सर्वात मोठा देश आहे. चीनकडून येणारा माल हा खूपच स्वस्त असल्यामुळे एकीकडे देशी उद्योगांना त्याचा फटका बसत आहे. दुसरीकडे एवढा व्यापार वाढूनही चीनचा भारताशी राजकीय व्यवहार आडमुठेपणाचा आहे. आपल्या देशाने चीनशी संबध ठेवताना सर्व विचार केला पाहीजे.संबध ठेवण्यासारखा हा देश वाटत नाही.

No comments: