
सातव्या वर्षीच मुंबई मॅरेथॉनला ‘ गोल्डन लेबल ’ मिळाल्याने यंदाच्या मॅरेथॉनला महत्त्व आले होते.अल्पावधीतच जगभरातील टॉप ५ मॅरेथॉनमध्ये स्थान मिळवणारी मुंबई मॅरेथॉन १७ जानेवारीला मुंबईच्या रस्त्यावर अवतरली होती.
मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे यंदाही आफ्रिकन धावपटूंनीच बाजी मारली.तब्बल ३८ हजार ४५० धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकरांनी रविवारी सकाळीच रस्त्याच्या दुतर्फा हजेरी लावली होती. भारतीय धावपटूंमधील आमीर्च्या रामसिंग यादवची मक्तेदारी यंदा त्याच्याच सहकारी बिनिंग लिंगखोयने मोडीत काढली.
पुढली अनेक वर्षे मुंबई मॅरॅथॉन होत राहील.भारतात काही चांगले धावपटू तयार होतील का? मॅयॅथॉनसाठी काही कोटी रूपयांची स्पॉन्सरशिप देणारे प्रोयोजक पायाभूत सोयी पुरवण्यासाठी तितक्याच तत्परतेने पुढाकार घेतील का? पण ही शर्यत कशासाठी? आपल्यातील एकजुट दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे का?एकजुटीपेक्षा प्रोयोजक आणि आयोजकाची पोटे भरण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. आश्चर्य म्हणजे माध्यमे सुध्दा या प्रकाराला प्रोत्साहन देत आहेत.
मॅरेथॉनपटूंचा उत्साह यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ओसंडून वाहत असला तरी त्यांच्या स्वागतासाठी सामान्य मुंबईकर मात्र यंदा फारसे रस्त्यावर उतरले नाहीत. २६ / ११ हल्ल्यानंतर झालेल्या गेल्यावर्षीच्या मॅरेथॉनच्या वेळी प्रचंड प्रमाणात मुंबईकर रस्त्यावर उतरून धावपटूंना चीअर अप करत होते. यंदा मात्र त्यांच्या उत्साहाला ओहोटी लागल्याचे जाणवत होते.
चमकायला मिळणार म्हणुन सेलेब्रेटीज या शर्यतीत मोठ्या संख्येने भाग घेताना दिसतात.यांच्या सहभागामुळे त्यांच्या सुरक्षेवर खर्च होत आहे. मँरेथाँन झाल्यानतंर ही मडंळी गायब होतात.
अझलन शहा व कॅनडा मालिकेतील विजेतेपद, पंजाब सुवर्णचषक रौप्यपदक, चॅम्पियन्स चॅलेंज ब्राँझपदक अशी सरस कामगिरी करूनही बक्षिसांचे हक्काचे पैसेही हाती पडत नसतील तर हॉकीपटूंनी काय करावे? त्यानी सरावाला न उतरता संप करावा लागतो. सर्व खेळाना सारखे अनुदान दिले पाहिजे.
हया मॅरेथॉनमुळे सामान्याना काय मिळाले? मोठ्याची मौजमजा झाली.नेत्यानी कार्यक्रम केल्याची त्याच्या वहीतनोंद केली.पोलिसानी दक्ष राहुन सुरक्षा केली.मोठा खर्च झाला.आता पुढे काय? कोणाचा फ़ायदा झाला?
1 comment:
आरोग्याची किमान पातळी राखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे सर्वसामान्याना पटवून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य होत आहे असे मला वाटते.
Post a Comment