मी शाळा व काँलेज मघ्ये असताना स्नेह संमेलनना हजेरी लावून मजा केलेली होती. सर्व मित्रमडंळी हजर राहायचे. खुप मजा करायचो. आठवण झाली त्या दिवसांची. पण आता खुप वर्षानी लहान मुलांच्या स्नेह संमेलनला हजर रहाण्याचा योग आला. लहान म्हणजे किती अडीच ते साडे तिन वर्षाची मुले. मुलुंड मधील 'डँफोडील'या नर्सरीतील मुलांचे स्नेह संमेलन होते. 'कालीदास नाट्यगृह' येथे वेळेच्या अगोदरच मी हजर राहीलो होतो.लहान मुलांपेक्षा त्याच्या आईबाबांची धावपळ जोरात सुरु होती. काही मुलांना तर झोपेतून उठवून आणले होते.नाट्यगृहात काळोख असल्याने काहीजण शांत बसले होते.तर काही मुले मस्त बागडत होती. काही मुलाना वेशभुषा स्पर्धेसाठी घरुनच तयार करुन आणले होते.
थोड्या वेळाने पाहुणे आल्यावर कार्यक्रम सुरु झाले.पाहुण्यानी दिप प्रज्वलित केल्यानतंर लहान चार मुलांनी 'हमको मन की शक्ती देना'ही प्रार्थना गायली. एवढ्या लहान मुलांनी ही प्रार्थना योग्य सुरात न चुकता गायल्याने त्याना टाळ्यांच्या गरजात प्रेक्षकानी प्रतिसाद दिला. ह्या गोडंस मुलाना ह्या प्रार्थनेचा अर्थ माहीत नसुन देखील त्यानी या प्रार्थेनला योग्य न्याय दिला. पालकांनी या मुलांचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. त्याच वेळेला हे स्नेह संमेलन सुदंर होणार याची सर्वाना कल्पना आली होती.या प्रार्थनेनतंर लगेच एकात्तमत्तेवर एक नाच सुरु झाला.सफेद फुले पाण्यात पडल्यानतंर हवेच्या झोक्याने इकडे तिकडे हलतात तसेच सफेद गणवेशातील ही मुले संगीतावर डोलत होती. खुपच सुदंर देखावा होता. पंधरा मुलानी हा नाच शिस्तीत केल्याने सर्व प्रेक्षकानी उभे राहून त्याना दाद दिली.इतक्या लहान मुलांकडुन असले कार्यक्रम बसविणे हे मोठे कठीण काम त्यांच्या शिक्षकाने चागंले पेलले होते.संपूर्ण कार्यक्रमाचा दर्जा वरचा होता.
त्यानतंर छोट्या मुलांची वेशभुषा स्पर्धा सुरु झाली.प्रत्येक स्पर्धाकाला त्याची आई स्टेजवर त्यांच्या नबंर प्रमाणे घेऊन येत होती. ही स्पर्धा पाहण्यासारखी होती.ही निरागस व भाबडी मुले स्टेजवर येताना घाबरत घाबरत येत.तर काही रडतच येत होती. काहीना उचळुन आणण्यात आले. त्यांच्या आया त्याना माईकवर बोलण्याचा आग्रह करीत पण डोळ्यावर लाईटस व समोर प्रेक्षक पाहून ती बुजत होती. थोडी बिदांस मुले माईक ओढत होती.निवेदकाने दिलेल्या वेगवेगळ्या उपमेमुळे या कार्यक्रमाला रंगत आली होती.
मुलांना जास्त त्रास होणार नाही याचा विचार करुनच कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जादुचे प्रयोग, दहीहंडी ,समुह गीते, असे एकापेक्षाएक नाविन्यपुर्ण कार्यक्रम सादर झाले.पाहुण्यानी लहान मुलांचे कौतुक करीत त्याना बक्षीस दिले.बक्षीस मिळाल्यावर मुले खुष होउन उड्या मारीत आईबाबाना दाखवत होती.आईबाबा मुलांचे कौतुक करीत होते.
कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने न करता ऋणकलश भरून करण्यात आली. कार्यक्रमाला हातभार लावलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फुलांची ओंजळ टाकून या ऋणकलश असाच भरून राहू दे अशी इच्छा व्यक्त केली गेली.
मुले नाचनाचत खुषीत घरी निघाली होती.एक चागंला कार्यक्रम पाहण्यास मिळाला व आपल्या लहानपणात गेल्यामुळे मला आनंद झाला.
दरवर्षी या लहानांच्या स्नेह संमेलनांना मी हजर राहणार आहे. तुम्हालाही अशी संधी मिळाल्यास ती दवडु नये.
No comments:
Post a Comment