डॉ. राजेंदप्रसाद (१८८४-१९६३)
राष्ट्रपतीपदाचा काळ २६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ स्वतंत्र भारताचे पहि ले राष्ट्रपती. स्वातंत्र्यसेनानी असलेले राजेंदप्रसाद हे सलग दोनदा राष्ट्रपतीपद भूषवणारे एकमेव राष्ट्रपती.
सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
राष्ट्रपतीपदाचा काळ १३ मे १९६२ ते १३ मे १९६७ तत्त्ववेत्ते, लेखक असलेल्या राधाकृष्णन यांनी आंध्रप्रदेश विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले होते.
झाकीर हुसेन (१८९७-१९६९)
राष्ट्रपतीपदाचा काळ ३ ते १९६७ ते ३ मे १९६९ हुसेन अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती असतानाच हुसेन यांचे निधन झाले होते.
श्री वरहगिरी व्यंकटगिरी (१८९४-१९८०)
राष्ट्रपतीपदाचा काळ ३ मे १९६९ ते २० जुलै १९६९ आणि २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४. गिरी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवण्यापूवीर् कामगार मंत्री आणि सिलॉनमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले होते.
फकरूद्दीन अली अहमद (१९०५ ते १९७७)
राष्ट्रपतीपदाचा काळ १४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७ हाडाचे राजकारणी म्हणून ओळख असलेल्या अहमद यांनी केंदीय मंत्रिमंडळात वेगवेगळी मंत्रीपदे भूषवली होती. अन्न आणि कृषी, शिक्षण, औद्योगिक विकास आदी मंत्रालयांचा कार्यभार त्यांनी समर्थपणे पेलला. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपण्यापूवीर्च १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले. राष्ट्रपती असतानाच निधन झालेले ते भारताचे दुसरे राष्ट्रपती.
नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२ रेड्डी आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. जनता पाटीर्कडून आंध्रमधून विजयी झालेले ते एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ मध्ये ते लोकसभा अध्यक्ष झाले. राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी १३ जुलै १९७७ मध्ये त्यांनी लोकसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ग्यानी झैलसिंग (१९१६-१९९४)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७ झैलसिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंदीय गृहमंत्री म्हणून काम केले.
आर. वेंकटरामन (१९१०-२००९)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२ माजी स्वातंत्र्यसैनिक असालेल्या वेंकटरामन यांनी अर्थ आणि उद्योग मंत्रालयाच्या मंत्रिपदी काम केले. त्यानंतर ते संरक्षणमंत्रीही होते.
शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७ शर्मा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर केंदीय मंत्री म्हणूनही काम केले. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि पंजाबचे राज्यपालपदही त्यांनी भूषवले. उपराष्ट्रपती असताना राज्यसभेतील अभूतपूर्व गदारोळ पाहून त्यांना अश्रू आवरता आले नव्हते.
के. आर. नारायणन (१९२०-२००५)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२ भारताचे पहिले दलित राष्ट्रपती. ते थायलंड, तुकीर्, चीन आणि अमेरिकेत भारतीय राजदूत होते. स्वतंत्र राष्ट्रपती म्हणून ओळख असलेल्या नारायणन यांनी राष्ट्रपती भवनात नवनवीन पायंडे पाडले.
ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९३१)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ विख्यात शास्त्रज्ञ असलेल्या कलाम यांचा देशाच्या आण्विक शक्ती आणि क्षेपणास्त्र निमिर्तीच्या कार्यात सिंहाचा वाटा आहे. भारतरत्न कलाम यांनी चार पुस्तकेही लिहिली आहेत.
प्रतिभा पाटील (१९३४)
राष्ट्रपतीपदाचा काळ २५ जुलै २००७ ते .... भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या पाटील यांनी पहिल्या महिला राज्यपाल म्हणूनही राजस्थानात काम केले. कलाम यांच्यानंतर राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या पाटील यांनी लढाऊ विमानातूनही झेप घेतली.

No comments:
Post a Comment