Thursday, January 28, 2010

अन्नधान्याची टंचाई होणारच.

'देशांमध्ये अन्नधान्याला वाढती मागणी आहे. त्यामुळे देशात अन्नधान्याचा पुरवठा होण्यासाठी आपले शेतकी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यास सध्या भेडसावत असलेला अन्नधान्याच्या टंचाईचा आणि महागाईचा प्रश्न निकालात लागेल त्यासाठी दुसरी हरितक्रांती होणे आवश्यक आहे' असा संदेश राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात दिला. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट प्रतीच्या बियाणांचा वापर, शेती करण्याच्या प्रगत पद्धती, पाण्याचे उत्कृष्ट नियोजन, विज्ञानाचा आधार आणि बाजारपेठांची उपलब्धता या सर्वांचा समन्वय साधायला हवा, शेतीचे उत्पन्न वाढल्यास खेड्यांत राहणाऱ्या आणि शेतीवर आपली उपजिविका करणाऱ्या सुमारे १४५ दशलक्ष कुटुंबांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे इतर उत्पादनांची मागणी वाढेल आणि याद्वारे इतर क्षेत्रांचाही विकास होईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कॉपोर्रेट व शेतकी क्षेत्रांत खूप साम्य असल्याने दोन्हींचा समन्वय साधल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


लोकसंख्या वाढल्याने अन्नधान्याचा तुटवडा होत आहे.शेतकी उत्पन्न वाढविले तरी त्यापेक्षा जास्त वेगातवाढत्या लोकसंख्येला ते उत्पन्न पुरेल काय? आपण शेत जमीनीवर मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करीत आहोत. वने तोडली जात आहे.त्याने पाउस कमी झाला आहे. पावसावर अवलंबुन असलेले शेतकी उत्पन्न कमी होते हे मानव निर्मीत आहे.पण काही वेळेस निसर्गाच्या कोपामुळेही शेतकी उत्पन्न कमी होते.यासाठी शेतकी क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे.


जोपर्यत आपण लोकसंख्येच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या पाहीजेत व त्या योजना अमंलात आणत नाहीत तोपर्यत कीतीही शेतकी उत्पन्न वाढविले तरीही अन्नधान्याची टंचाई होणारच. येणा-या परीस्थीतीला जाण ठेवूनच उपाययोजना तत्परतेने अमंलात आणल्या पाहिजेत. पुढचा काळ खुप कठीण आहे.याचा विचार करण्याची वेळ आली आहे.शेतक-यांचे हात थोडे आहेत पण खाणारे हात जास्त आहेत.हे प्रमाण योग्य होत नाही तोपर्यत अन्नधान्याची टंचाई होतच राहणार.देशाचा विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या नियंत्रणाशिवाय दुसरा पर्याय नाही.यासाठी राष्ट्र्पतीनी 'हरीतक्रांती ' सारख्या लोकसंख्येसाठी नविन योजना आखल्या पाहिजेत.

1 comment:

साळसूद पाचोळा said...

राष्टपती ताईंना म्हाणाव हे आम्हास का सांगता आहात, ते करून दाखवा ना... त्या साठिच तर तुम्हाला राष्टपती, पंतप्रधान, क्रुषिमंत्री बनविअले आहे ना...? लोकांना उअपदेश देत बसण्यापेक्षा सरकार्ने काही ठोस करावे हिच तर जनतेची अपेक्षा असते ना?