केलवा बीच,(माहिम) पालघर जवळ येथे सहलीला गेलो होतो.समुद्रावर मजा करण्यास गेलो.लाटावर स्वार होत सर्वासह दंगामस्ती केली.भिजुन झाल्यावर क्रिकेट खेळलो.मजा आली.सुरुच्या बागेतुन बाहेर पडत होतो.दोन्ही बाजुला फेरीवाले स्थानिक गोष्टी विकत होते.नारळाचे पाणी व ताडगोळ्यांची चौकशी करुन पैशाचे ठरल्यावर मी ताडगोळे खाण्यास सुरुवात केली. त्यावेळेला माझा एक मित्र सर्वाना बटाटेवडे वाटत होता. भुक लागल्याने इतर मडंळी आवडी खात होते. तो वाटत वाटत माझ्याजवळ आला आणि त्याने मला वडे देउ केले.माझे ताडगोळे खाण्याकडे लक्ष होते.त्याने देउ केलेले वडे मी नाकारले.तो पुन्हा पुन्हा मला देत होता. मी त्याला रागावून मला वडे नकोत असे धमकावले.तो पण माझ्यावर वैतागला.मला आग्रह करुन मी अव्हेरले म्हणुन तो रागावला. मित्राने जे काय उरलेले वडे माझ्याकडे टाकले व व्यैतागत म्हणाला,'एवढ्या प्रेमाने देतो तर तुला घ्यायला मस्ती आलीआहे'.मी असले तळलेले पदार्थ खात नाही आणि निर्सागाने दिलेल्या गोष्टी (ताडगोळे/नारळ)मी आनंदाने खात आहे असे त्याला समाजावयाचा प्रयत्न केला.पुढे आम्ही यावर चर्चा केली.
आपली जीवनशैली आणि आपलं आरोग्य यांचा थेट संबंध असतो.मात्र निरामय जीवनासाठी आपला आहार,विहार आणि आपली जीवनशैली सुयोग्य असावी,नियमित व्यायामही आवश्यक आहे.दिवसभर तुम्ही काय खाता याचा परिणाम तुमच्या फिटनेसवर होत असतो. फिटनेस कायम राखण्यासाठी योग्य तोच आहार घेतला पाहिजे कारण हेच अन्न शरीरात जाऊन शक्ती, बुद्धी, आरोग्य आणि सुंदरता वाढवतं तसंच चुकीचं अन्न गेल्यास आरोग्य बिघडू शकतं. तरुण वयातील मुलांना स्वाभाविकत:च तळलेले पदार्थ आणि चमचमीत मसालेदार पदार्थ आवडतात. हे पदार्थ ते पचवूसुद्धा शकतात , पण त्यांचा अतिरेक झाला की , त्यांच्या त्वचेवर त्याचा वाईट परिणाम दिसायला लागतो. मग खूप उशीर झाल्यावर त्यांचे डोळे उघडतात. खुप वेळा उकळेल्या तेलात तळलेले पदार्थ शरीराला अपायकारक ठरते.हे पदार्थ घरी बनवून खाल्यास त्याचा त्रास होत नाही.मुलांनी आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसांतून एकदाच असे पदार्थ खाण्याचा नियम करावा म्हणजे ते पचतील आणि त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहील. आहारात कॅल्शियम , प्रोटिन्स , काबोर्हायड्रेट्स , आयर्न आदी मिनरल हे संपूर्णपणे घेणे आवश्यक आहे. म्हणून आहार सकस घ्यावा. जाडी वाढण्याची भीती असल्यास नेहमीच थोडं कमी खावं , अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत जेऊ नये , पण आहार मात्र समतोल असावा. आपल्यापैकी किती जण पोषक आहार घेतात आणि आहाराच्या चांगल्या सवयी अवलंबतात? आपला सध्याचा आहार हा मुख्यत: चवीवर आधारलेला आहे.त्यात बदल केला,तर औषधोपचारावर खर्च होणारच. ज्या आहारामुळे शरीराची हानी होते,असा आहार सोडून देऊन पोषक आहार पद्धती सुरू करावी.तसंच हा,कॉफी,मद्य,तंबाखू हेही आरोग्यास अपायकारक आहे.
मुंबईसारख्या शहराची जीवनशैली अतिशय धावपळीची असते. जेवायला सुद्धा लोकांना इथे वेळ नसतो. घाईघाईत काहीतरी पोटात ढकलायचं अशी सवय झालेली दिसते. त्यात सध्या फास्ट फूड, जंक फूड कडे लोकांचा कल वाढला आहे. आम्ही काहीही खाल्लं तरी चालेल, आम्हाला काही होणार नाही अशी तरुणांची समजूत असते. पण अनावश्यक भोजन पोटात गेल्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात याची त्यांना कल्पना नसते. ब्रेड, बर्गर, बटाटेवडे, समोसे ,फ्राईचीज, कोल्ड ड्रींग्ज खाल्यामुळे पोट भरतं आणि हे पदार्थ खाल्याने काही नुकसान होत नाही अशी चुकीची समजूत तरुणांनी करून घेतली आहे. पण तसं नाहीये. एका झटक्यात कदाचित दुष्परिणाम जाणवणार नाहीत पण हे पदार्थ म्हणजे 'स्लो पॉयझनिंग' आहे. हळूहळू त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवू लागतात आणि पचन प्रक्रिया बिघडू लागते. नंतर हेच पदार्थ विष बनतात आणि आरोग्यास हानीकारक ठरतात.
No comments:
Post a Comment