Thursday, February 18, 2010

सरकारचा जरब उरला नाही.

पुण्यात झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटानंतरच 'हुजी' ने ही धमकी दिली आहे. भारतात होणारा हॉकी वर्ल्ड कप, आयपीएल क्रिकेट मॅचेस आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेण्यासाठी विदेशी खेळाडूंनी भारतात जाऊ नये.अन्यथा गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल,अशी धमकी 'हुजी' या पाकव्याप्त काश्मिरातील खतरनाक अतिरेकी संघटनेने दिली आहे. आमच्या इशा-याचे उल्लंघन करून भारतात खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू गेले तर अतिरेकी हल्ले करण्यात येतील अशी धमकी त्याच्याकडुन देण्यात येत आहे.'हुजी'चा प्रमुख इलियास काश्मिरीच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही. भारतावर दहशतवादी कोणतीही गोष्ट लादू शकणार नाहीत.देशात येणा-या प्रत्येक परदेशी संघांना कडेकोट सुरक्षा देऊ. प्रत्येक परदेशी खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिका-याला केंद सरकार संरक्षण देईल.पण धमकी देणा-यांना दम भरला नाही.

देशात सर्व बाजुनी घुसखोरी वाढलेली आहे.शेजारील देश आपल्याला जागेवर हक्क दाखवु लागले आहेत.त्याच्याच मदतीने अतिरेकी बाँम्बस्फोट करीत आहेत.राजकारण्यांना राजकारणातुन वेळ कोठे आहे.संरक्षण खाते सुस्तावलेले आहे.दहशतवादी हल्ल्यात आपले जवान मारले जात आहेत.

अमेरीकेतील कडक़ सुरक्षेमुळे नविन दहशतवादी हल्ले झाले नाहीत. पण आपल्याकडे आपल्या देशातील संघटनांना हाताशी पकडुन अतिरेकी कारवाया करीत आहेत. राज्य सरकार जनतेचे संरक्षण न करता चित्रपट गृहांचे सरंक्षण करण्यात गुंतले आहे.तसेच नेत्यांचेही संरक्षण केले जाते. अतिरेकी संघटनेने बनावट नोटा चलनात आणुन आपल्या देशाची अर्थव्यवस्था दुबळी करुन टाकली आहे.

अतिरेकी संघटना आपल्या देशाला इशारे देण्याचे घाडस कसे काय करु शकतात? त्याना कोणाचातरी पाठींबा असला पाहीजे? जगात आपली जरब तगडी असली पाहीजे की आपल्या कडे नजर उचळुन पाहताना भिती वाटली पाहिजे. सरकारने या अतिरेकी संघटनेंच्या इशा-या नजुमानता चागंलाच दम भरला पाहिजे .नतंरच येणा-या परदेशी खेलाडुंना त्यांच्या संरक्षणाचा विश्वास दाखवला पाहिजे. देशाचे गृह खाते नेहमीच राज्य सरकारला हल्ल्याच्या शक्यतेच्या इशा-याचे पत्र पाठवुन मोकळे होतात.राज्य सरकार आपल्या पोलिस दलाना याची माहिती देऊन शांत राहतात.पण हल्ला झाल्यावर मात्र सर्वजण एकमेकाना दोषी ठरवितात.
२६/११ च्या ह्ल्ल्यात पकडलेल्या अतितेक्याला आपण संरक्षण देऊन सुरक्षित ठेवल्याने ह्या संघटना आपल्याला इशारे देण्याचे घाडस करु शकतात.ह्या अतिरेकी संघटनांवर जरब बसविण्यासाठी सरकारने आपली संरक्षण यत्रंणा कायम सावध ठेवून ह्ल्ले थांबवले पाहिजेत.

No comments: