
टिव्हीच्या चँनलवरुन परदेशी पर्यटकाना न फसवता त्यांचे आदरार्तीथ्य करा असे आवाहन 'अतिथी देवो भव' या जाहिरातीतून अमीर खान जनतेला करतो हे आपल्या पंरपरेला साजेसे वाटत नाही.या जाहिरातीत भूरटे चोर व किरकोळ विक्रेते यांच्याकडून पर्यटकांची होणारी फसवणुक दाखविली आहे.यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात या पाहुण्यांची आपले ट्रँव्हल एजंट, हाँटलेवाले, टँक्सीवाले ,उपाहारगृहवाले,व परकीय चलन बदलून देणा-यांकडून फसगत होत असल्याने त्यांच्याकडे आपल्या बद्दलची प्रतिमा बदलत चालली आहे.या पर्यटकाना ही मडंळी मोठे गि-हाईक समजून नेहमीच लुटत असतात व त्रास देतात.या लुटांरुचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे.काहीवेळा पर्यटकांचे पैसा संपल्याने त्याना बिकट परीस्थितीला तोंड द्यावे लागतात. ह्ल्ली बलत्कारांच्या घटनेने त्यांच्यात भितीही निर्माण झाली आहे.दहशतवादी हल्ल्यांपासून आपल्या देशात येणां-या परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.आपण अशा पध्दतीने यापर्यटकांचा पाहुणचार केला तर आपल्याकडे यांचे येणे बंद झाल्याने आपले बरेच नुकसान होईल याचा विचार करुन असल्या घटना टाकळ्यासाठी सर्वानी मिळुन याला विरोध केला पाहीजे.यांच्या चोरीबद्दलच्या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जात नाही.भाषेची अडचण नेहमीच येत असते. 'अतिथी देवो भव'असल्या जाहिराती करण्याची गरज लागली नाही पाहिजे.परदेशी पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले असल्याने त्यांना सुरक्षा दिली तरच हे पाहुणे मोठ्या संख्येने आपल्याकडे येतील.
'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रात २२/०२/२०१० ही प्रतिक्रिया प्रसिध्द झाली आहे.
No comments:
Post a Comment