Tuesday, February 23, 2010

प्रसिध्दी,आहुती की आत्मह्त्या?

स्वतंत्र तेलंगणासाठी शनिवारी उस्मानिया विद्यापीठाच्या आवारात स्वत:ला पेटवून घेणाऱ्या श्रीपुरम यादैया (१९) या विद्यार्थ्याचा अखेरीस मृत्यू झाला. यादैयाच्या मृत्यूमुळे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी त्याचा मृतदेह रातोरात त्याच्या मूळ गावी रेड्डी जिल्ह्यातील नागाराम येथे नेला व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मृत्यूसमयी त्याच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात त्याने 'तेलंगणासाठी आपण स्वत:च्या प्राणाची आहुती देत आहे' असे लिहिले होते.
या उमद्या तरुणांने कोणत्या कारणाने असे आत्मदहन केले असेल?
कोणाच्या मागणीने की कोणाच्या धमकीने?
हा निर्णय घेण्यास कोणी प्रवृत्त केले असेल का?
कशासाठी हे कृत्य त्यानी केले असेल? प्रसिध्दी,आहुती की आत्मह्त्या?
या कृत्यासह स्वत:च्या प्रसिध्दि करता करता नकळत तो जास्त भाजला गेला का?
त्याला आत्महत्या करण्यास हे योग्य कारण मिळाले होते का?
त्याने खरच तेलंगणाच्या स्वंतत्र होण्यासाठीच आहुती दिली होती का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता त्यासह निघून गेली आहेत का?
तेलंगणासमर्थक त्याच्या कुटुंबीयाना कधीपर्यत मदत करत राहतील?
राजकीय नेते याच्या ह्या कृत्याचा फायदा घेणारच ना?
ह्या कार्यकत्यांसाठी राजकीय नेते काय करतील का?

आताचे तरुण आवेशात पुढचे पाठीमागचे विचार न करता टोकाचे निर्णय कसे घेतात?

1 comment:

Anonymous said...

Such steps are taken to establish personal ego, which is the most important need of any person.