Thursday, February 25, 2010

मैत्री व दारु




काय करतोस मित्रा
चल आज दार पिऊ या
अरे , कसे तु ओळखसं माझ्या मनातले मित्रा.






जेव्हा दारुने फेसाळलेले ग्लास ऐकामेकाला भिडतात व 'चिअरस्'असा जल्लोष होतो तेव्हाच मैत्रीला खरी सुरुवात झालेली असते.

दारु पिण्यासाठी मित्रांनी साद घातली तर सर्व मित्र हातातली कामे बाजुला ठेवून पार्टीला आर्वजून हजर राहतात.


मैत्री व दारु यांचे वेगळेच आहे.

सहवासाचा आनंद देणारं-घेणारं नातं म्हणजे मैत्री.मैत्री व दारुचे जवळचे नाते आहे.मैत्रीनेच दारु जवळ केली जाते तर काही वेळेला दारुनेच मैत्री घटट होते. याचा अर्थ दारु शिवाय मैत्री होउ शकत नाही असे माझे म्हणणे नाही.मित्र रुसला आणि अबोला घरला तर दारुने तो पटकन सुटला जातो.मग मैत्री कुणाशी करावी,तिचे निकष काय असावेत,ती दीर्घकाळ कशी टिकवायची हे त्या दोधानीच ठरवायचे असते.पण दारुने मैत्री दीर्घकाळ टिकविता येते असे वाटते.दारु असेल तर रोजच 'फ्रेंडशिप डे' साजरा होउ असतो.


सर्वसाधारणपणे समविचारी तसंच समवयस्क लोकांची पटकन मैत्री होते पण दारु पिणारे कोणत्याही वयाचे असले तरी मैत्री होण्यास वेळ लागत नाही. मैत्रीचं नातं जपायचं असतं.


मित्र संबंधात तुम्ही दुस-यांसाठी जे काही कराल ते स्नेहाने करायचे आहे. केवळ कर्तव्य म्हणून कराल तर ते चालणार नाही.
हृदयाच्या झ-यातून वाहणा-या प्रेमरूपी पाण्याचा निखळ खळखळाट म्हणजे मैत्री, आपला पाय घसरला असता तोल सावरण्या साठी एखाद्याच्या खांद्यावर आपण मोठ्या विश्वासाने हात ठेवतो, तो विश्वास म्हणजे मैत्री. दारुतली मैत्री तर याच्याही पुढची आहे.


दारुत मैत्री होते तर दारुत मैत्री तुटतेही.दारु प्यायल्यावर मैत्रीला उधान येते.मित्राला काय करु आणि काय करु नको असे होते.एकदम जीवाभावा जवळच वाटतो.पुर्वीचे गुन्हे माफ केले जातात.गळ्यात गळे घालून एका पेल्यात दारु प्याली जाते. काही वेळेला दारु प्यायल्यावर नशेत मित्राबद्दलचे खरे मत देखील बाहेर पडते.त्याचे दोष जास्त दिसायला लागतात.दारु न पिता, घीर नसल्याने मित्राची उणीघुणी काढु शकत नाही पण दारु प्यायलावर तो शेर बनतो व मित्राची करुन टाकतो. मित्रांमघली जुनी खुनस मिटवायची असल्याने दारु सारखे दुसरे पर्याय नाही.


एखाद्या मित्राला दारुचे व्यसन लागले तर हेच मित्र त्याला दारु न पिण्यास प्रवृत करतात.पण एखादा मित्र दारु पित नसेल तर हेच मित्र त्याला दारु पिण्यास प्रवृत करतात.



दारु पिणारे ख-या मैत्रीची जपणुक करतात.तर काही मित्र मित्राला दारु पाजुन फसवितात आणि न होणा-या गोष्टी पदरात पाडुन घेतात.मैत्रीत असे वागणे वाईट आहे.

सगळे मित्र जेव्हा दारु पितात तेव्हा एखादा मित्र पार्टीला आला नाही तर त्याच्या नावांने पहिल्या ग्लासातील थोडी दारु त्यांच्यातली मैत्री सिध्द करण्यासाठी बाहेर शिंपडतात.हे दारुच्या मैत्रीतले अलिखित नियम सर्वानी मान्य केलेले आहेत.


दारु पिणारे मित्र दारु न पिणा-या मित्रांपेक्षा नेहमीच जवळेच असतात.त्याचा मान मोठा असतो.त्याना सर्व कार्यक्रमाना आमंत्रण आर्वजून दिले जाते.

मैत्रीत मर्यादा पाळाव्या लागतात.दारु पिणेही मर्यादित ठेवावे लागते.या म्रर्यादांचे उल्लंघन केल्यास धोकादायक ठरते.
















No comments: