आरक्षण आरक्षण आरक्षण.
समाज, घर्म, जातीना आरक्षण, शिक्षणात आरक्षण,जागेत आरक्षण,नोकरीत आरक्षण, प्रवासात आरक्षण सगळीकडे आरक्षण.कोठेही जा आरक्षण असते. आता आरक्षणात आरक्षणाची मागणी होत आहे.
जन्म झाल्यापासून आरक्षण सुरु होते ते मेल्यानंतर संपते.समाजातील दुर्बल घटकांसाठी हे आरक्षण दिले जाते.आरक्षणासाठी नेहमीच वाद होत राहतात.प्रत्येकाला आरक्षणाला तोंड द्यावेच लागते.
लिंग,जात,घर्म,शिक्षण,गरीबी अशा बाबींवर राज्यघटनेने राजकीय,सामाजिक,आर्थिक न्यायासाठी आरक्षण दिले आहे.समाजात समानता येण्यासाठी आरक्षण देण्यात येते.आणखी कुठे कुठे आरक्षण देण्यात येणार आहे.सामाजातला सामान्य घटक या आरक्षणामुळे भरडला जात आहे.
व्यक्ती मग ती कोणत्याही जाती-पातीची असली तरी आर्थिक दुर्बलतेमुळे ती असहाय्य होते. गरिबी हा घटक व्यक्तीच्या विकासाच्या आड येऊन तिची प्रगती खुंटते. असे घडू नये यासाठी त्या व्यक्तीला मदत करणे गरजेचे असते. त्यामुळेच सवर्णांतील आथिर्कदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आरक्षण ठेवले पाहिजे.
सगळ्या क्षेत्रातुन आरक्षणाची मागणी वाढत आहे. आरक्षण केव्हा रद्द होईल का? समाजाला आरक्षणाशिवाय शिस्त लागणार नाही का? आरक्षणाची गरज केव्हापर्यत लागणार आहे?
1 comment:
सगळी आरक्षणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवून टाकले पाहिजेत! तुमचं अगदी बरोबर आहे. नालायक राज्यकर्ते आपला देश फुकून टाकत आहेत.त्यापेक्षा इंग्रजांची सत्ता असताना त्यानी विकास चांगला केला होता.
Post a Comment