Thursday, March 18, 2010

अमेरिकन जोडप्याचे मुबंईत लग्नसोहळा.

गुढी पाडव्याला मला माझ्या डाँक्टर काकांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचे आमंत्रण होते.मुलगा अमित उच्चशिक्षणासाठी काही वर्षापूर्वीच अमेरीकेत गेला होता.आता तो अमेरीकेतच स्थायिक झाला आहे.अमितने तेथे अमेरीकेतच लग्न जुळवून आईबांबाची समंती घेतली.मुलगी जन्मापासुन अमेरिकन आहे.

अमितच्या आईबाबानी या दोघांचे लग्न गुढी पाडव्याचा मुहुर्तावर मुबंईत करण्याचे ठरविले.आमंत्रणाप्रमाणे मी ठाण्यातील स्वागत यात्रेत सहभागी होउन मराठी पंरपरेचे दर्शन घेतल्यानतंर लग्नासाठी निघालो.लग्नसोहळा एका हाँटेलमघ्ये आयोजित केला होता. लग्न कोणत्या पध्दतीने करणार? याच्याबद्दल मला शंका होती. माझे काका मुबंईतले,मुलगा अमेरिकेत स्थायिक तर मुलगी कडची मडंळी अमेरिकेतील अशा नातेवाईकांमुळे लग्न अमेरिकन पध्दती कि आपल्या सस्कृंतीप्रमाणे होणार याचा विचार करीत चाललो होतो. दोघे एकामेकाना आगंठी घालणार,केके कापणार,डान्स करणार,ड्रिक्स घेणार असा लग्नविघी पाहण्यास मिळणार अशी माझी कल्पना होती.

याचा विचार करीत करीत हाँलजवळ आलो.आलेली पाहुणे मडंळी माझ्यासारखी गोधळात दिसली.अमेरिकन लग्नाला आपण जात आहोत असे सर्वजण एकामेकांची थट्टामस्करी करीत करीत हाँलमघ्ये शिरतानाच केळीच्या खांब लावलेले पाहीले आणि मी खुष झालो.लग्न आपल्याच पध्दतीने होणार आहे याची मला पावती मिळाली.लग्न आपल्याच पध्दतीने होणार आहे याची मला पावतीच मिळाली.हाँलमघ्ये शिरताच काका व काकी मराठी पेहरावात पाहुण्याच्या स्वागताला उभे राहीले होते.मी त्याना भेटुन लग्न आपल्या पध्दतीने केल्याबद्दल पहीले त्यांचे अभिनदंन केले.त्याच्याकडुन कळले, अमितची लग्न आपल्या पध्दतीनेच करण्याची अट होती.मी तसाच अमितला भेटण्यास सरावला.छोट्या शामियानात अमित घोतर नेसुन व गोरी गोरी नवरी नववारी साडीत लग्नविधीत व्यस्त होती.तो मुबंईत खुप दिवसानी आला होता तरी अमेरिकेच्या संस्कृतीचा त्याच्यावर फरक पडलेला दिसत नव्हता.त्याचे मराठीवर प्रेम असुन तो मराठी सस्कृंती व पंरपरा जपतो.त्याचा मला अभिमान वाटला.नवरा धोतर तर नववारी व नथ घातलेल्या नवरीला पाह्ण्यास व त्यांचे अभिनदंन करण्यास पाहुणे आतुर झाली होती.जेष्टमडंळीना नमस्कार करुन वधुवराने आशिवार्द स्विकारले.वर्षाच्या प्रारंभालाच परदेशात मराठीची जपणुक करणारा भेटल्याने आनंद झाला.लग्न विधी वेबक़ँम मदतीने अमेरीकेत दाखविले गेले. लग्नसोहळा पाहण्यासारखा झाला.

No comments: