
भारतातील अतिरेकी कारवायांचे आरोप असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने अपेक्षेप्रमाणेच त्याच्यावरील आरोपांचा कबुलीजबाब अमेरिकेतील शिकागो न्यायालयात दिला आहे. हेडलीविरुद्धचा मुख्य गुन्हा २६/११च्या हल्ल्याचा कट रचण्याचा आहे.त्याने कट रचला आणि कसाब व त्याच्या अन्य नऊ सहका-यांनी त्याची अमलबजावणी केली.कटाच्या सूत्रधाराला अधिक जबरी शिक्षा व्हायला हवी. हा गुन्हा भारतात घडल्याने चौकशी व खटल्यासाठी त्याला आपल्या ताब्यात मिळावे, ही भारताची साहजिक मागणी होती. २६/११ हल्ला प्रकरणी जिवंत पकडला गेलेला एकमेव फिदायीन आरोपी अजमल कसाब याच्यावरील खटल्याचा आता शेवटचा टप्पा सुरू होत आहे. अशा वेळीच हेडलीने कबुलीजबाब दिला आहे.तसेच हेडलीच्या कबुलीजबाबामुळे कसाबच्या खटल्यावर काही परिणाम होऊ नये.
२६/११/२००८ पासून अतिरेकी कसाबला पकडुन त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पैसा व मनुष्यबळ वाया घालवित आहे. लष्कर-ए-तोयबासारख्या कारस्थानी संघटना अतिरेकी कारवाया रचना-या हेडलीसारख्या आतंरराष्ट्रीय गुन्हेगारासाठी मोठी सुरक्षा ठेवावी लागेल.यासाठी जनतेचा पैसा पुन्हा वापरला जाणार.अमेरिकेने हेडलीला जरी आपल्या हाती देण्याचे ठरविले तरी ते आपल्यावर कितीतरी जाचक अटी लादतील. अमेरिकेने हेडलीला जरी आपल्या हाती देण्याचे ठरविले तरी ते आपल्यावर कितीतरी जाचक अटी लादतील. त्यापेक्षा तो अमेरिकेतच 'सुरक्षित'आहे. तसेच त्याच्या गुन्ह्याबद्द्ल त्याला फ़ाशीची शिक्षा झाली तर आपले सरकार त्याला फाशी देतील का? हेडलीला भारतात न आणता अमेरिकेत जाऊनच चौकशी केली जावी.हेडलीने अमेरिकेच्या ज्येष्ठ पोलिस व गुप्तचर अधिका-यासमवेत कबुलीजबाब कराव्यात.नतंर कबुलीजबाबावरुन वाद होउ नये.
अमेरिकेच्या एफबीआय व अन्य गुप्तहेर संस्थांची व आजी-माजी राज्यर्कत्यांचीही पंचाईत व नामुष्की होईल, हे जाणूनच हेडलीबद्दल अमेरिकेने सौम्य धोरण स्वीकारले असावे. हेडलीला अमेरिकेतच 'सुरक्षित' ठेवणे, त्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे. दाऊदला भारतात आणण्यात आपल्या सरकारला अद्याप यश आलेले नाही. भारत आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या संबंधाची दृढता पाहता हेडलीची अमेरिकेत येऊन चौकशी करण्याची परवानगी भारतीय गुप्तचर संस्थांना व अधिका-यांना मिळाली पाहिजे.
डेव्हिड कोलमन हेडली या आतंरराष्ट्रीय गुन्हेगाराला पोसण्यासाठी आपल्या देशात आणु नये.
1 comment:
अमेरिकेला अल् कायदावर नियंत्रण मिळविण्यांत रस आहे, दहशतवाद मोडून काढण्यात नाही. अशा परिस्थितीत हेडलीला भारतात पाठविले जाणार नाही.
Post a Comment