Wednesday, March 31, 2010

सेवानिवृत्ती

तसे दर महिन्याच्या दिवशी शेवटच्या कर्मच-यांची सेवानिवृत्ती होत असते.शेवटच्या दिवशी त्याच्या निरोप समारंभ होत असतो. जुन्या आठवणी काढुन त्याना शुभेच्छा दिल्या जातात.त्यांच्यासाठी पार्ट्याही आयोजित केल्या जातात.
आज आँफिसमघ्ये माझे जुनी स्नेही अचानक पुढे आले व हस्तोलंदन केले.'मी आज सेवानिवृत्त होत आहे 'असे त्यानी मला सांगितले.त्याच्या डोळ्यात पाणी दिसल्याने मला खुप वाईट वाटेल.त्याच्या नजरेत मला दोन भाव दिसत होते. एक माझ्या नोकरीच्या काळात काही अडचणी आल्या नाही व मी सहीसलामत निवृत होत आहे व दुसरा उद्दापासुन मी आँफिसमघ्ये येणार नसल्याने माझे सर्व मित्र भेटणार नाहीत.त्याला व्यवस्थित निवृत झालो याचा आनंद होत असतो तर उद्दापासुन काय हा प्रश्न समोर असल्याने तो काळ्जीत दिसतो.पण ज्यानी अगोदरच पुढचा दिनचर्य ठरवलेला असतो तो तर सेवानिवृत्तीची वाट पाहत असतो.
प्रत्येकाला या सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागते.प्रत्येकाच्या नशीबात हा दिवस येतोच.पण हल्ली जी तरुण मडंळी ज्या वेगात नोक-या बदलतात त्याना या सेवानिवृत्तीचे महत्व काय कळणार.जास्त पगारासाठी नोकऱ्या बदलण्याची प्रवृत्ती तरुण वयात जास्त असते. क्षमता असेल तर नोकरी वा धंद्यातील आव्हाने जरुर स्वीकारावीत. पण ती कुठल्या वयापर्यंत हे ठरविले असले पाहिजे.
सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर मात्र आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करण्याचे प्रत्येकानी ठरविले पाहिजे.नोकरीत वा व्यवसायात असताना आपले बारा ते पंधरा तास बिझी जात असतात. सेवानिवृत्ती झाल्यावर या वेळेचे नियोजन केले नसेल तर घर खायला उठते, त्यातून चिडचीड होऊन कौटुंबिक व वैयक्तिक स्वास्थ बिघडते.सेवानिवृत्तीनंतरचा काळ आपण कसा व कुठे घालविणार आहोत, याचा विचारही सेवानिवृत्तीपूवीर्च करायला हवा.
निवृत्तीनंतरची आथिर्क विवंचना टाळण्यासंबंधीचे प्रबोधन चांगले केले आहे .बचतीचे नियोजन सर्वात निर्णायक ठरते, त्याच बरोबर गुंतवणुकीसाठी लागणारी जोखीम घेण्याची क्षमता आणि भविष्यातील संभाव्य खर्चाचा अंदाज योग्य वेळी घेणे हेही सेवानिवृत्तीनंतरचा निवांतपणा ठरविते.
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणा-या वेगवेगळ्या लोकांचे असे अनुभव वेगवेगळे आहेत.काही नोकरीच्या त्रासामुळे, आजारामुळे,कुटुंबाच्या आथिर्क समश्येमुळे तर काही मोबदला चागंला मिळत असल्याने स्वेच्छानिवृत्ती घेतात.
सनदी सेवेतून निवृत्त होताना एखाद्या महत्त्वाच्या पदावर नेमणुक करून घेतली, की पुढील पाच वषेर् त्या पदावर दिमाखात व आरामात काम करता येते. माहिती आयुक्त, उप लोकायुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य मानवी आयोग, केंदीय निवडणूक आयुक्त, वीज नियामक आयुक्त अशा अनेक पदांवर सेवानिवृत्ती सनदी अधिका-यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.

No comments: