मुंबईतील मंगलदास माकेर्ट, ओएनजीसी आणि ठक्कर मॉल या ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखल्याच्या संशयावरून 'एटीएस'ने रियाझ अबू अली (२३), व अब्दुल लतिफ ऊर्फ गुड्डु (२९) यांना शनिवारी रात्री माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ पकडले.या दोघांच्या 'पाकिस्तान कनेक्शन'चा तपासात उधकीस आले.गुड्डू आणि रेहान यांच्या संभाषणातील अंकल म्हणजे बशीर खानच असल्याचा पुरावा एटीएसला मिळाले आहे.
या कारवाईत हे दोघे अतिरेकी यशस्वी झाले असते तर मुबंईत मोठा संहार झाला असता याचा विचार कोठे झालेला दिसत नाही.मनुष्यहानी व वित्तहानी भयानक झाली असती.याचा विचार केल्यास ह्या दोघाना पकडण्यात एटीएस यशस्वी झाले हे फार महत्व घडले आहे.य पुढील तपासात आणखी काही माहीती आपल्या हाती मिळेल. त्याने आपण आपली सुरक्षितता वाढवू शकतो.पण या एटीएस अधिका-याची शाबासकी व प्रशंसा झालेली कोठेच दिसली नाही.हा त्याच्या कार्याचा भाग असलातरी त्यानी पार पाडलेल्या कामगिरीचे जाहीर सत्कार व्हायला पाहिजे होते.उलट श्रेयाच्या लढाईत श्री.रघुवंशी यांच्या एटीएस प्रमुख पदाच्या कामगिरीबद्धल केवळ राज्य गृहखातेच नाराज नव्हते तर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पोलीस यंत्रणेच्या अधिका-यांनी देखिल त्यांनी केलेल्या काही कारवायांबाबत नाराजी व्यक्त करुन त्यांची बदली केली.
1 comment:
majhya mahiti pramane tyanche badli hi yach sandarbhatli gupt mahiti phodnya mule jhali hoti !
Post a Comment