Tuesday, April 6, 2010

चुकलो..साँरी.


चुकल्या वर माणुस 'साँरी' म्हणतो.चुकलो, चुकलो, चुकलो.क्षमा असावी.माफ करा.हे सगळे शब्द 'साँरी' या एका शब्दात सामावलेले आहेत. आपल्या हातून चूक होणं, यात योग्य अयोग्य असं काही नाही. माणूस म्हटल्यानंतर चूका या होणारच. पण, आपण चुकलो असतानाही त्याची जाणीव न होणं आणि जाणीव झाल्यानंतरही 'सॉरी' म्हणायला जड जाणं, हे अयोग्य. 'मी चुकलो, सॉरी', असं म्हणायलाही जिगर लागते. आपण चुकलो ही 'गिल्टी' भावना मनात राहण्यापेक्षा 'सॉरी' हा साधा शब्द म्हणणं केव्हाही सोयीस्कर. सॉरी हे दोन शब्द नातं आणखी घट्ट होण्यास करतं. गैरसमज दूर करतं. सांत्वन करतं. अश्रूंना थांबवण्याची ताकद या शब्दामध्ये आहे.
प्रत्येकाने आपल्या कृत्याबद्दल खरंच सॉरी म्हणणं गरजेचं आहे का, हे आधी ठरविले पाहिजे. आपण चूक केली नाही असं वाटतं असेल तर सॉरी म्हणण्यात काही अर्थ नाही. सारखं सारखं सॉरी म्हणण्यामुळे आपण स्वत:लाच कमी लेखतो. पण, नकळतपणे तुम्ही दुस-यांच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याचा शांतपणे विचार करा आणि सॉरी म्हणा. यात तोटा काहीच नाही. आपल्या हातून चूक झालीच नाही असं वाटत असेल तर, दुस-या मार्गाने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करा. उगाच गोंधळू नका आणि परिस्थिती गुंतागुंतीची करू नका.
सॉरी म्हणण्यासाठी अनेकवेळा अहंकार आड येतो पण, सॉरीमुळे जर इतके सारे फायदे होत असतील तर अहंकार बाजूला ठेवायला काय हरकत आहे.
सॉरी म्हणण्यात प्रामाणिक राहा. यामुळे समोरच्याच्या नजरेत तुमच्याविषयी आदर निश्चितच वाढेल.
क्षमेची अपेक्षा न करता सॉरी म्हणुन मोकळे व्हा. पण दुस-याडुन 'साँरी'ची अपेक्षा करणे अयोग्य वाटते.
साँरी बोलल्याला नतंर त्याला तुम्हाला माफ करायचं की नाही हे ठरवण्यासाठी वेळ द्या.यामुळे तुमच्याबद्दल आदर वाढेलच.
आपल्या चुकीबद्दल इतर कारणं देणं किंवा दुसऱ्याला दोषी ठरवणं हे पळपुटेपणाचं लक्षण आहे. यात तुमचंच नुकसान आहे. सॉरी म्हणा आणि तो विषय तिथेच संपवा. मनात सल किंवा कुत्सित भावना अजिबात बाळगू नका. असं जर केलं तुमची प्रगती खुटंलीच म्हणून समजा.
प्रामाणिकपणे समोरच्याच्या नजरेला नजर भिडवूनच सॉरी म्हटले तरच समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमती भावना पोहोचते.पण या पद्धतीने सॉरी म्हणण्याला खरोखर धैर्य लागतं.
सॉरी हे दोन शब्द नातं आणखी घट्ट होण्यास मदत करतं. गैरसमज दूर करतं. सांत्वन करतं. अश्रूंना थांबवण्याची ताकद या शब्दामध्ये आहे.इंग्रज आपल्यावर राज्य करुन गेले आणि 'सॉरी' हा शब्द आपल्यासाठी सोडुन गेले,असे बोलले जाते.आपण पण रोजच्या व्यवहारात खुपच वापरुन महत्व दिले आहे.

चुकल्यानतंर व साँरी बोलल्यानतंर ती चुक सुधारण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे.नाहीतर वारवांर साँरी साँरी बोलावे लागेल.

No comments: