भारताची ग्रँड स्लॅम मिळवणारी पहिली महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाहाचा इरादा व्यक्त केल्यानंतर ती प्रसिध्दीच्या झोतात आली.तिला तिच्या खेळात जेव़ढी प्रसिध्दी मिळाली नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिध्दी या लग्नाने तिला मिळाली आहे.मिडीयाने या लग्नाच्या बातम्या चागंल्याच कँश केल्या आहेत.
वृतपत्रातुन व टी.व्ही चँनलवरुन या लग्नाच्या बातम्या टळकपणे प्रकाशित करुन खुपच महत्व दिले जात आहे. आँफिसातुन,काँलेजमघुन,मित्रामडंळीमघ्ये,गाड्यांमघुन,महिलांमघ्ये हिच्या लग्नाचीच चर्चा रंगत आहेत.अजुन काही दिवस तरी हे लग्न मिडियावाले गाजविणार आहेत. हा खरा रियालीटी शो वाटतो.
आतापर्यत प्रसिध्द झालेल्या बातम्या.
शोएबने आयेशाला दिले १५ कोटी
हे मॅरेज फिक्सींग तर नव्हे?
शोएब प्रेम ट्रँगलची बॉलिवूड ‘बिर्याणी’ बिर्याणी, शेरवानी आणि परेशानी!
अटकेला घाबरून शोएबचा आयेशाला 'तलाक'
राज ठाकरेंचा सानियाला विरोध सानिया देशद्रोही
पुरस्कार परत घ्या!... तक्रार दाखल शोएबची माघार
आयेशाला 'तलाक'?
शोएब, आगे बढो, हम तुम्हारे साथ है.
सानिया-शोएब 'निकाह'वर 'बेटिंग'
शोएबभोवती 'फिल्डिंग' शोएब भिऊ नकोस सानिया तुझ्या पाठीशी आहे
शोएबची फक्त चौकशी अटक नाही!
टेनिसस्टार या घरची... होणार सून त्या घरची!
शोएबविरोधात तक्रार दाखल
सानियाविरोधी निदर्शनात २० जणांना अटक.
याच गडबडीत नक्षलवादी हल्ल्यात ७० जवान शहिद झाले या बातमीकडे सर्वानी दुर्लक्ष केलेले आहे.वाईट वाटले.सरकारच्या रणनाती मुळे हे नक्षलवादी यशस्वी झाले आहेत.या कारणाने सरकारने या बातमीला प्रसिध्दी दिली नाही.विरोधी पक्षाने लग्नाला विरोध दाखवला पण सरकारला हल्ल्यात ७० जवान शहिद झाले याचा जाब विचारला नाही.
कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याचे तारतम्य बहुसंख्य दृश्य प्रसारमाध्यमांनी सोडले आहे आणि सवंग राजकारणाच्या ठेकेदारांनीही. देशाच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय सोडून, सेलेब्रिटींभोवती निर्माण झालेल्या वा केलेल्या वादांत आपले डोके गहाण ठेवत गुंतून पडावे, यासाठी प्रसारमाध्यमांची धडपड सुरू असते.
No comments:
Post a Comment