'हरिश्चद्रांची फँक्टरी'या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची अतुलनीय घ्यासाची साहसकथा लोकांसमोर आली आहे.या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या फाळकेंच्या चित्रफिती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचे अत्याधुनिक तत्रंज्ञानाने संवर्धन करणे जसे सरकारचे काम आहे तसे चित्रपटसृष्टीचेही आहे.आताची चित्रपटसृष्टी ज्याच्यावर यशस्वीपणे उभारली आहे ती याच चित्रफितीवर.दादासाहेब फाळके यांच्या नावाने चित्रपटसृष्टीतील कलाकारांना लाखो रुपायांची बक्षिसे देउन गौरविण्यात येते.पण त्यानी केलेल्या पहिल्या सिनेनिमिर्तीच्या चित्रफितीच्या संवर्धनासाठी चित्रपटसृष्टीतला कोणताच कलाकार पुढाकार घेताना दिसत नाही याची खंत वाटते.पुढच्या पिढीसाठी चित्रपटसृष्टीने या चित्रफिती सुस्थितीत ठेवून जतन करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.'राजा हरिश्चंद्र' तेवीस मिनिटांच्या चित्रपटाचा अमुल्य ठेवा लोकांसमोर आणल्यास दादासाहेब फाळकेना अनोखी आदंराजली ठरेल.
ही प्रतिक्रीया १० एप्रिलच्या 'महाराष्ट्र टाइम्स' मघ्ये प्रसिध्द झाली आहे.
No comments:
Post a Comment