Thursday, May 6, 2010

शिक्षा सुनावल्यानतंर कसाब रडला.


आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा प्रतिनिधी बनून अनेक निरपराध भारतीयांचे प्राण घेणा-या अजमल आमीर कसाबला ठोठावली गेलेली मृत्यूदंडाची सजा ऍकल्यानतंर त्याने चेहरा हाताने झाकून तो रडू लागला ही बातमी वाचण्यात आली. कशासाठी हा रडला असेल?

जन्मठेपेची शिक्षा न दिल्याने,आयुष्य संपल्याने,सरकारचा राजेशाही पाहुणचार सपंल्याने,स्वत:च्या आप्ताना यापुढे भेटु न शकल्याने,एकापेक्षा जास्त लोकांना मारले तरी फाशी मग मी जास्त लोकाना का मारु शकलो नाही अशा कारणाने तो रडला असेल.ज्याने निरपराधांना मारले तेव्हा याला रडु आले नाही आणि आता आपल्यावर मरण्याची पाळी आल्यावर याला रडु कोसळले.निरपराधांना मारले तेव्हा त्याला आनंद झाला असेल तर मग आता का रडतो?याला रडायला लाज वाटली नाही.जेव्हा त्याने अतिरेकी संधटनेत प्रवेश केला त्यावेळेपासुन त्याने रडणे विसरले पाहिजे होते.
कसाबने ज्याना मारले त्यांच्या नातेवाईकाना त्याने रडायला लावले.पोलीस अधिकारी व पोलीस शहिद झाले तेव्हा त्याचे कुटुंबीयांवर संकट कोसळले व जनता ह्ळहळली.तेव्हा कसाब आनंदात असेल.मग आता हा कसाब रडण्याचे नाटक का करत आहे?कट्टर अतिरेकी खुलेआम असा कसा रडु शकतो?आपण केलेल्या कृत्याची आता त्याला जाणीव झाली का?

No comments: